Taliban sakal media
ग्लोबल

तालिबानशी भारताची पहिली अधिकृत चर्चा; कतारमध्ये बैठक

या बैठकीला तालिबानकडून निमंत्रण देण्यात आलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानचा विजय झाल्यानंतर भारताची आज तालिबानी नेत्यांसोबत अधिकृत चर्चा झाली. कतारची राजधानी दोहा येथे भारताचे राजदूत दीपक मित्तल आणि तालिबानी नेता शेर मोहम्मद अब्बास स्टानेकजई यांनी भेट झाली. या बैठकीसाठी तालिबानकडूनच निमंत्रण देण्यात आलं होतं.

अफगाणिस्तानातील स्थितीबाबत भारत आणि कतार सातत्यानं संपर्कात आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर तोडगा निघावा यासाठी कतारचे एक विशेष राजदूत मुतलक बिन माजीद अल कहतानी याच महिन्याच्या सुरुवातीला नवी दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी भारताला अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी कतारला बोलावलं होतं.

तालिबानचं एकमेव राजकीय कार्यालय २०१३ पासून कतारमध्ये आहे. कतारची राजदानी दोहा इथेच तालिबान, अफगाण सरकार आणि अमेरिकेमध्ये अफगाणिस्तानातील सत्ता कराराबाबत चर्चा झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest High Drama : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; दिल्लीत भाजपच्या आमदाराच्या लेकीला पोलिसांकडून ताब्यात! फोटो समोर

Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

गद्दार, देशद्रोही! अभिजीत दीपके अन् सौरभ दास यांचा विमानातील प्रवाशांशी वाद; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : ‘देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही’; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Pune News : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; शनिवार वाड्याजवळ कार्यकर्ते ताब्यात

SCROLL FOR NEXT