S. Jaishankar Replied Europe on Russian Oil
S. Jaishankar Replied Europe on Russian Oil esakal
ग्लोबल

युरोपकडून युद्धानंतर रशियन तेलाची सर्वाधिक खरेदी, भारताचं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अनेक देशांकडून रशियावर कठोर टीका करण्यात आली. रशियाविरोधात बोलण्यासाठी भारतावर देखील दबाव टाकण्यात आला. तसेच भारतावर टीका करण्यात आली. पण, आता या टीकेला भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Foreign Minister S. Jaishankar) यांनी उत्तर दिले आहे. युद्धापूर्वीची आणि युद्धानंतरची तुलना केली तर आता युरोप रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करत आहे, असं जयशंकर म्हणाले.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनचे परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांच्या उपस्थितीत ही टीका केली. जेव्हा तेलाच्या किंमती वाढतात, तेव्हा कोणताही देश आपल्या देशासाठी काय चांगलं आहे याचा तपास घेण्यासाठी बाजारात जातात. आपण दोन ते तीन महिने वाट पाहून प्रत्यक्षात रशियन तेल आणि वायूचे मोठे खरेदीदार कोण आहेत हे पाहिले तर परिस्थिती पूर्वीपेक्षा वेगळी नसेल. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या १० मध्येही भारताचा क्रमांक नसेल, असं जयशकंर म्हणाले.

रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव सध्या भारत दौऱ्यावर आहेत. रशियातून तेल आणि इतर काही वस्तू आयात करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतली. आमची आजची बैठक आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत होत असून भारत नेहमीच संवाद आणि मुत्सद्देगिरीने मतभेद-वाद सोडवण्याचा प्रयत्न करतोय, असं जयशंकर यांनी सांगितलं.

रशियानं भारताला स्वस्त दरात तेल खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर भारत सरकारने रशियाकडून तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून पाश्चिमात्य देशांनी जोरदार टीका केली. याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा देखील अमेरिकेने दिला होता. तसेच युद्धाला समर्थन असणाऱ्या देशामध्ये भारताचं नाव इतिहासात भारताची नोंद होईल, असं अमेरिकेनं म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT