india galwan valley holi in galwan valley 
ग्लोबल

१७ हजार फूटांवर आयटीबीपीच्या जवानांनी सेलिब्रेट केली होळी; Video Viral

शर्वरी जोशी

संपूर्ण देशभरात होळी आणि धुलिवंदन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी लोकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत होळी साजरी केली. तर, काही ठिकाणी  सोशल डिस्टंसिंगचा फज्जादेखील उडाला. यामध्येच लडाखच्या गलवानमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी होळी साजरी केली. विशेष म्हणजे तब्बल १७ हजार फूट उंचीवर ही होळी हटके अंदाजात साजरी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. आयटीबीपीच्या जवानांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून एएनआय या वृत्तसंस्थेने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आयटीबीपीचे जवान हरियाणवी गाण्यावर थिरकतांना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर होळीचा आनंद आणि उत्साह पुरेपूर दिसून येत आहे. विशेष म्हणजे देशाची सेवा करणारे जवान प्रत्येक सण,उत्सवदेखील शक्य होईल त्या पद्धतीने  साजरा करण्याचा प्रयत्न करतात हे दिसून येतं.

दरम्यान, देशात होळी आणि धुलिवंदन हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. देशातील प्रत्येक नागरिक विविध रंगात न्हाऊन निघतात. त्यातच मधुरा,वृंदावन आणि बरसाना येथील होळी विशेष प्रसिद्ध आहे. या ठिकाणी १५ दिवस होळीचा उत्साह साजरा केला जातो.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT