India-Shrilanka Sakal
ग्लोबल

श्रीलंकेच्या 'आधार कार्ड'साठी भारत करणार मदत; अनुदानाला मंजुरी

बायोमेट्रिक डेटाच्या आधारे व्यक्तिगत ओळखीसाठी श्रीलंकेत तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे.

दत्ता लवांडे

श्रीलंका : भारताने श्रीलंकेच्या 'डिजिटल ओळख' योजनेला मदत करण्यासाठी सहमती दर्शवली असून श्रीलंकेच्या मंत्रीमंडळात ७ फेब्रुवारीला हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेतील हा डिजिटल आयडी आधार कार्डच्या तंत्रज्ञानावर अवलंबून असणार आहे. श्रीलंकेचे कॅबिनेट मंत्री नामल राजपक्षे यांनी मंत्रीमंडळात ही माहीती दिली आहे. भारताच्या मदतीसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

श्रीलंका सरकारने सांगितले की, बायोमेट्रिक डेटाच्या आधारे व्यक्तिगत ओळखीसाठी तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. हे एक डिजिटल टूल असेल ज्याच्या आधारे व्यक्तीची शारिरिक ओळख डिजिटल ओळखीत रुपांतर केली जाणार आहे.

रिपोर्टनुसार या प्रक्रियेची सुरुवात २०१९ मध्ये नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या दरम्यान झालेल्या द्वीपक्षीय चर्चेत झाली होती. श्रीलंकेने भारताकडून अनुदान मिळवण्यासाठी एका सामंजस्य करारावर सह्या करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर अनुदानाविषयी आत्तापर्यंत काहीही माहीती मिळाली नव्हती. सध्या श्रीलंका आर्थिक संकटात सापडला आहे. भारताने प्रत्येक संकटाच्या वेळेला श्रीलंकेची मदत केली आहे. २०२२ च्या सुरुवातीपासून आत्तापार्यंत भारताने तब्बल १०,४६२ रुपयांची मदत केली आहे.

'द हिंदू' या वृत्तसंस्थेच्या एका अहवालानुसार या प्रक्रियेची सुरुवात आधीच झाली होती. २०१५-२०१९ च्या दरम्यान श्रीलंकेत मैत्रीपाला सिरीसेना आणि रानिल विक्रमसिंघे सरकारने सुद्धा नागरिकांच्या डिजिटल ओळखासाठी प्रयत्न केला होता. परंतु वैयक्तिक माहीतीच्या संरक्षणावरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे हे प्रकरण तिथेच थांबले. त्याअगोदर महिंदा राजपक्षे सरकारने २०११ मध्ये यासाठी प्रयत्न केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT