joe biden 
ग्लोबल

भारत, द.आफ्रिकेचा प्रस्ताव अमान्य करा; अमेरिकेच्या खासदारांची बायडेन यांना विनंती

पीटीआय

वॉशिंग्टन - कोविड-१९ प्रतिबंधक लस निर्मितीसंदर्भातील बौद्धिक संपदाचा हक्क माफ करावा, असा भारत आणि दक्षिण आफ्रिकेने जागतिक व्यापार संघटनेसमोर मांडलेला प्रस्ताव मान्य करु नये, अशी विनंती अमेरिकेच्या चार खासदारांनी अध्यक्ष ज्यो बायडेन यांना केली आहे. खासदार माइक ली, टॉम कॉटन, जोनी एर्नेस्ट आणि टोड यंग यांनी अध्यक्ष बायडेन यांना प्रस्ताव फेटाळून लावावा, अशी मागणी केली. 

भारत, दक्षिण आफ्रिका आणि अन्य देशांनी कोविड-१९ प्रतिबंधक लशीच्या निर्मितीसाठी सर्व बौद्धिक संपदांचे हक्क माफ करावेत, असा प्रस्ताव जागतिक व्यापार संघटनेसमोर मांडला आहे. या प्रस्तावामुळे लशीचा पुरवठा सुरळीत होईल, असे भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे म्हणणे आहे. मात्र अमेरिकेच्या खासदारांनी या प्रस्तावाला आक्षेप घेतला आहे. पत्रात म्हटले की, या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर अमेरिकी कंपन्यांकडून विकसित होणारी बौद्धिक संपदा नष्ट होईल आणि लसची निर्मितीत अधिक कंपन्या उतरतील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य संघटना उद्योग प्रतिनिधींची बैठक घेणार
जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष ट्रेड्रोस घेब्रेयेसेस यांनी म्हटले की, लस विकसित करण्याची क्षमता असलेल्या देशांना जागतिक व्यापार संघटनेच्या विशेष आपत्कालिन तरतुदीनुसार बौद्धीक संपदा अधिकारांना माफी द्यायला हवी. जागतिक आरोग्य संघटना लवकरच उद्योग प्रतिनिधींची बैठक घेणार असून उत्पादनात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळा खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

Latest Marathi News Live Update : शरद पवार आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर, काय आहे कारण?

'हा कसला फालतूचा अ‍ॅटिट्यूड' काजोल पापाराझींवर भडकल्याने नेटकरी संतापले, Viral Video

Maharashtra kerosene Supply: राज्य सरकारचा रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; वितरण करणारी व्यवस्था नामशेष, रॉकेल येणार पण स्टोव्हच सापडेना!

SCROLL FOR NEXT