India, UAE decide to settle trade in rupees Sakal
ग्लोबल

UPI Linkage: रुपया आंतरराष्ट्रीय चलन होण्याच्या दिशेने? फ्रान्सनंतर यूएईमध्येही UPIचा डंका

भारताचा रुपया आता आंतरराष्ट्रीय चलन बनण्याच्या मार्गावर आहे.

राहुल शेळके

UPI Linkage: भारताचा रुपया आता आंतरराष्ट्रीय चलन बनण्याच्या मार्गावर आहे. 18 देशांनी आधीच रुपयात व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अलीकडेच, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) संदर्भात फ्रान्ससोबत करार करण्यात आला आहे.

भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांनी व्यवहारासाठी इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म IPP सह UPI जोडण्याचे मान्य केले आहे. या दोन्ही मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींच्या UAE अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी झालेल्या विस्तृत चर्चेदरम्यान सहमती झाली.

याशिवाय अबुधाबीमध्ये आयआयटी दिल्लीचे कॅम्पस स्थापन करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान सामंजस्य करारही करण्यात आला आहे. फ्रान्सनंतर पंतप्रधान मोदी यूएईला पोहोचले. फेब्रुवारी 2022 मध्ये दोन्ही देशांदरम्यान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार झाला होता.

पीएम मोदींनी ट्विट करून माहिती दिली की, आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक नियमन सुलभ करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये एक करार झाला आहे.

करारानंतर पहिल्या व्यवहारात 12.84 कोटी रुपये देऊन 25 किलो सोने मुंबई येस बँकेत हस्तांतरित करण्यात आले आहे. UAE भारताला चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक कच्चे तेल आणि दुसऱ्या क्रमांकावर LPG आणि LNG पुरवतो.

UAE मध्ये राहणार्‍या भारतीयांना मिळणार लाभ

UAE मध्ये राहणाऱ्या भारतीयांना या कराराचा फायदा होणार आहे. लोक RuPay कार्ड वापरण्यास आणि RTGS आणि IMPS द्वारे पैसे हस्तांतरित करु शकतील. यामुळे दोन्ही बाजूंनी गुंतवणूक सुलभ होईल, असे आरबीआयचे म्हणणे आहे.

या करारानंतर, दोन्ही देशांच्या मध्यवर्ती बँका भारताच्या UPI आणि UAE च्या इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्मला एकमेकांशी जोडतील. याशिवाय RUPAY आणि UAESWITCH देखील एकमेकांशी जोडले जातील. हे कार्ड दोन्ही देशांमध्ये वैध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update : कुर्ल्यात इमारतीच्या पाचव्या माळ्याला आग

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT