Mukul Arya Sakal
ग्लोबल

Palestine: भारतीय अधिकाऱ्याचा मृत्यू; परराष्ट्रमंत्र्यांकडून शोक

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : पॅलेस्टाइनमधील भारतीय दुतावासातील अधिकारी मुकुल आर्य यांचं निधन झालं. सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी मोहीम सुरू असताना ही घटना घडली आहे. त्यानंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. (Indian ambassador mukul arya passed away in palestine)

पॅलेस्टाइनमधील रामल्ला येथे रविवारी ते दुतावासात होते. त्यानंतर भारतीय दूतावासात ते मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या मृत्यूसंदर्भातील अधिक माहिती अजून समोर आली नाही. त्यांच्यामृत्यूनंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पॅलेस्टाइनचे परराष्ट्रमंत्री डॉ. रियाद अल मलिकी यांनीही मुकुल आर्य यांच्या कुटुंबियांप्रती सहनुभुती व्यक्त केली आहे.

दरम्यान मुकुल आर्य यांनी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयातही कामं केलं होतं. ते २००८ सालच्या बॅचचे अधिकारी होते. त्यांनी काबूल आणि मॉस्कोमध्येही भारतीय दूतावासात काम केलं होतं. त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत भरती होण्याअगोदर दिल्ली विश्वविद्यापीठ आणि जवाहरलाल विद्यापीठात अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता.

त्यांच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर एस. जयशंकर यांनी भावनिक ट्वीट करत म्हटलंय की, "रामल्लामध्ये भारतीय दुतावासातील अधिकारी मुकुल आर्य यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला आहे. ते एक हुशार आणि बुद्धिमान अधिकारी होते. ओम शांती." असं लिहित त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना ठाकरेंचा पक्ष, एकनाथ शिंदेंनी फायदा घेतला - सिब्बल

IND vs SL 1st Test: सामन्यात १० विकेट्स, तरी मानव सुथारला POM चा पुरस्कार नाही! कोण ठरला सर्वोत्तम खेळाडू अन् का?

Nagpur Muddy Road: दीड वर्षातच पांदण रस्त्याची ‘माती’; देवमुंढरीचा रस्ता चिखलमय; दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

MPSC Success Story: ‘गावच्या मातीतून प्रशासकीय सेवेत झेप’! गायत्री देशमुखची जिद्द, मेहनतीने MPSC मध्ये दमदार कामगिरी, मुलींमध्ये राज्यात दुसरी

Pune Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; ५ ते ६ वाहनांची धडक, रिक्षाचालक गंभीर

SCROLL FOR NEXT