vivek murthy 
ग्लोबल

बायडेन यांच्या सर्जन जनरलपदी भारतीय डॉक्टर; ओबामांसोबतही केलंय काम

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन - भारतीय अमेरिकन डॉक्टर विवेक मूर्ती यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे सर्जन जनरल नियुक्ती झाली. अमेरिकेच्या संसदेनं मंगळवारी यावर मतदान घेऊन शिक्कामोर्तब केलं. अमेरिकेला कोरोनाचा मोठा फटका बसला असताना या कठिण काळात विवेक मूर्ती हे महत्वाचं पद सांभाळणार आहेत. विवेक मूर्ती यांच्या बाजून 57 अमेरिकन खासदारांनी मत दिलं. तर 43 जणांनी त्यांच्या नावाला विरोध दर्शवला. संसदेत बहुमतासह विवेक मूर्ती यांची बायडेन यांचे सर्जन जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉक्टर विवेक मूर्ती यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळातही सर्जन जनरल म्हणून काम केलं होतं. 2017 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मूर्तींना हटवलं होतं. 

बायडेन यांचे सर्जन जनरल म्हणून नियुक्त झाल्यानंतर विवेक मूर्ती यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, सर्जन जनरल म्हणून पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. गेल्या एक वर्षात अनेक अडचणींचा सामना देशाने केला आहे. मी आपल्या देशाला आणि मुलांच्या भविष्याला चांगलं करण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे असंही ते म्हणाले. 

विवेक मूर्ती यांच्या बाजूने डेमोक्रेटिकच्या खासदारांसह रिपब्लिकनच्या खासदारांनीही मते दिली. रिपब्लिकन सिनेटर बिल कॅसिडी, सुसान कोलिन्स, रोजर मार्शन, लिसा मुर्कोवस्की, रॉब पोर्टमॅन, मिट रोमनी आणि डॅन सुलिवन यांनी मंगळवारी विवेक मूर्ती यांच्या बाजूने मत दिलं. डॉक्टर विवेक मूर्ती हे पब्लिक हेल्थ सर्विस किमीशनच्या कोअरमधील एक मान्यवर असे फिजिशियन आणि माजी व्हाइस अॅडमिरलसुद्धा आहेत. 

कोरोनाच्या काळात मूर्ती यांच्या कुटुंबातील काही लोकांना कोरोना झाला. मूर्ती यांनी खासदारांसमोर सांगितलं की, सर्वसामान्य लोकांना स्पष्ट आणि विज्ञानावर आधारीत मार्गदर्शन करेन आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी मदत करण्याची इच्छा आहे. अमेरिकन नागरिकांना मास्क घालण्यासाठी तयार करणं हे एक कठीण आव्हान असणार आहे. याआधी मूर्ती यांनी बायडेन यांच्या कोरोना व्हायरससाठी तयार करण्यात आलेल्या सल्लागार मंडळात सहअध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. बायडेन यांच्या निकटवर्तींयापैकी एक अशीही मूर्ती यांची ओळख आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atpadi Pomegranate Market : आटपाडी बाजारात 6,780 क्रेट डाळिंबाची विक्रमी आवक; प्रतिकिलो 100 ते 171 रुपयांचा मिळाला दर, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मला चामड्याच्या पट्ट्याने मारलं... पहिल्या पत्नीने नागराज मंजुळेंवर केलेले गंभीर आरोप, म्हणाल्या- 'तो माणूस...'

Latest Marathi Live Update: सहा तासांत कार चोरीचा उलगडा; दोन आरोपी अटकेत

Satara Heavy Rain : सातारा जिल्ह्यात जिल्‍ह्यात सर्वदूर पाऊस; पावसाने ठिकठिकाणी दरडी कोसळल्या, काही रस्ते वाहतुकीस बंद

Where is Cabo Varde? मेस्सी अन् अर्जेंटिनाची झोप उडवणारा केप व्हर्दे कुठेय माहित्येय? ५ लाख लोकसंख्या, दहा बेटांचा एक देश, जो नकाशात शोधूनही सापडत नाही...

SCROLL FOR NEXT