Indian In Ukraine Sakal
ग्लोबल

Operation Ganga: युक्रेनमधील १८२ भारतीय दिल्लीला रवाना

ऑपरेशन गंगा मोहीमेचं हे सातवं उड्डाण असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

दत्ता लवांडे

युक्रेन आणि रशियामध्ये सध्या युद्ध सुरु असून अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. सध्या अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी भारताने 'ऑपरेशन गंगा' नावाची मोहीम राबवली आहे. याद्वारे भारतीयांना सध्या मायदेशात आणण्याचं काम सुरु आहे.

रशियाकडून युक्रेनवर मिसाईल हल्ल्यांचा भडिमार चालू आहे. यामध्ये युक्रेनचं मोठ नुकसान झालं असून काही सैनिक मारले गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान युक्रेनने रशियाचे ४३०० सैनिक मारल्याचा दावा केला आहे. आणि रशियाच्या हल्ल्यात ११६ लहान मुलं आणि १६८४ नागरिक जखमी झाल्याची माहीती युक्रेनकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सध्या खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय सध्या युक्रेनच्या सीमेवर पोहचून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. काही भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थांना सीमेवर रशियाच्या सैनिकांना मारहाण केली होती. दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन गंगा' मोहीम राबवण्यात आली आहे. याद्वारे भारतीयांना इतर देशांच्या मार्गे भारतीयांना आणण्यात येत आहे. रोमानिया, हंगेरी, पोलंड या मार्गे भारतीयांना मायदेशात आणण्यात येणार आहे.

ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना रोमानिया आणि ब्युकारेस्टमधून दिल्लीला रवाना करण्यात आलं आहे. या विमानात १८२ भारतीय असल्याचं भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या ट्वीटरवरुन कळवण्यात आलं आहे. ऑपरेशन गंगा मोहीमेचं हे सातवं उड्डाण असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. तसेच इतर भागात अडकलेल्या भारतीयांना सुखरुप भारतात आणण्यासाठी मंत्रालयाकडून प्रयत्न सुरु असल्याचं समजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT