ग्लोबल

कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी भारतीय वंशाच्या अनिता आनंद

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये अनिता आनंद यांच्यावर देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी भारतीय वंशाची असलेल्या अनिता आनंद यांची वर्णी लागली आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये अनिता आनंद यांच्यावर देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिता आनंद यांच्या आधीही भारतीय वंशाचे हरजीत सज्जन हे संरक्षण मंत्री होते. लष्करातील प्रमुख सुधारणांवर अनिता आनंद यांचा भर असेल असं म्हटलं जात आहे.

अनिता आनंद यांच्याकडे संरक्षण खाते सोपवल्यानंतर हरजीत सज्जन यांच्याकडे परराष्ट्र खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हरजीत यांच्यावर लष्करातील व्यभिचाराची प्रकरणे हाताळण्यात अपयश आल्याचे आरोपही झाले आहेत. अनिता यांच्याकडून आता लष्करातील या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचं आव्हान असणार आहे.

अनिता यांचा जन्म १९६७ मध्ये नोवा स्कोटिया इथं झाला. त्यांचे आई वडिल दोघेही भारतीय असून वैद्यकीय क्षेत्रात आहेत. अनिता यांची आई सरोज या पंजाबच्या तर वडील एस व्ही आनंद हे तामिळनाडुचे आहेत. अनिता यांनी टोरांटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. २०१९ मध्ये ओकविले इथून त्यांनी खासदारकीची निवडणूक लढली होती. त्यानंतर त्यांनी मंत्रीपदही सांभाळले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT