Rishi Sunak sakal
ग्लोबल

Rishi Sunak : ऋषी सुनक यांच्यासाठी भारतीयांचे मतदान निर्णायक;‘युगोव्ह’चे सर्वेक्षण, ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ला कमी समर्थन

ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदासाठी गुरुवारी (ता.४) निवडणूक होणार आहे. देशातील सर्वेक्षण संस्था ‘युगोव्ह’च्या माहितीनुसार विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला नागरिकांचा फारसा पाठिंबा मिळत नसल्याचे दिसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

लंडन : ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदासाठी गुरुवारी (ता.४) निवडणूक होणार आहे. देशातील सर्वेक्षण संस्था ‘युगोव्ह’च्या माहितीनुसार विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला नागरिकांचा फारसा पाठिंबा मिळत नसल्याचे दिसत आहे. ब्रिटनमधील अनिवासी भारतीय मतदारांचेही समर्थन मिळविण्यात सुनक यांना यश मिळत नसल्याचे दिसत आहे. येथील ६५ टक्के भारतीय सुनक यांच्या पक्षाविरोधात आहेत. सुमारे २५ लाख भारतीय मतदार येथे आहेत. सुनक यांच्या पंतप्रधानपदाच्या दीड वर्षांच्या कार्यकाळात भारतीयांसाठी कोणताही मोठे काम केलेले नाही. व्हिसाचे नियम पहिल्यापेक्षा कडक केले. त्याचबरोबर महागाई आणि रोजगाराच्या मुद्द्यावरही सुनक यांनी काहीही उपाय केले नाहीत, असे सर्व्हेत सहभागी झालेल्या मतदारांचे म्हणणे आहे.

भारतीयांच्या मतदानाचे महत्त्व

  • ब्रिटनमधील ६५० पैकी सुमारे ५० जागांवर भारतीय मतदारांची विजय-पराभवाच्या गणितात निर्णायक भूमिका

  • लेस्टर, बर्गिंहॅम, कॉन्व्हेंट्री, साऊथ हॉल आणि हेरॉसमधील अशा १५ जागांवर गेल्या दोन वर्षांपासून भारतीय वंशाचे उमेदवार विजयी

  • यंदा या ठिकाणी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाबद्दल भारतीय मतदारांमध्ये नाराजी तर विरोधी लेबर पक्षाच्या उमेदवारांना मोठे समर्थन मिळत आहे

  • सध्या या १५ जागांपैकी १२ जागा ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’कडे आहेत

भारतीयांनी घेतले ब्रिटनचे नागरिकत्व

  • गेल्या पाच वर्षांत ८३ हजार ४६८ भारतीयांनी भारताचे नागरिकत्व सोडून ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले

  • युरोपमधील कोणत्याही देशातील ही संख्या सर्वाधिक

  • याआधी २०२२पर्यंत गोल्डन व्हिसाअंतर्गत २५४ भारतीय धनवानांनी ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले होते

नियोजित वेळेआधी निवडणूक

  • ब्रिटनमध्ये गुरुवारी (ता.४) निवडणूक होणार

  • सुनक यांनी ‘१० डाऊनिंग स्ट्रिट’मधून २२ मे रोजी निवडणुकीची घोषणा केली होती

  • सुनक पहिल्यांदाच मतदारांसमोर जाणार

  • लेबर पक्षाकडून नेते कीर स्टार्मर रिंगणात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT