ग्लोबल

कोरोना काळातही भारतीयांच्या स्विस बँकेतील पैशात तिपटीने वाढ

विनायक होगाडे

झुरिक : एकीकडे कोरोनामुळे लोकांची अवस्था खराब झालेली असताना, दुसरीकडे स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये भारतीयांचा पैसा वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. स्विस बँकांमध्ये भारतीय लोक आणि भारतीय कंपन्याचा जमा पैसा 2020 मध्ये वाढून 2.55 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच जवळपास 20,700 कोटी रुपयांहून अधिक झाला आहे.

काल गुरुवारी स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती केंद्रीय बँकेने जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे. स्विस नॅशनल बँकेच्या आकडेवारीनुसार, 2019 च्या अखेरपर्यंत भारतीयांच्या जमा रक्कमेचा आकडा 899 मिलीयन स्विस फ्रँक म्हणजेच 6,625 कोटी रुपये होता. मात्र, 2020 मध्ये हा आकडा वाढून 20,700 कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. 2019 सालातील आकडेवारी देखील दोन वर्षांच्या घसरणीच्या ट्रेंडच्या बरोबर उलट होती. ही आकडेवारी अधिकृत असून काळ्या पैशाशी या आकडेवारीचा संबंध नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

2020 सालातील हा आकडा गेल्या 13 वर्षांमधील सर्वाधिक आकडा आहे. याआधी 2006 मध्ये ही रक्कम जवळपास 6.5 बिलीयन स्विस फ्रँक इतक्या उच्च स्तरावर होता.

कोणत्या देशाची सर्वाधिक रक्कम स्विस बँकेत?

स्विस बँकेत रक्कम जमा करण्याच्या बाबतीत सर्वांत पुढे ब्रिटन हा देश आहे. या बँकेत ब्रिटनच्या नागरिकांचे 377 अब्ज स्विस फ्रँक जमा आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका देश आहे. अमेरिकेच्या लोकांनी आतापर्यंत 152 अब्ज स्विस फ्रँक जमा केले आहेत. स्विस बँकेत पैसे ठेवणाऱ्या देशांच्या क्रमवारीत भारत 51 व्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक रक्कम जमा करणाऱ्या ब्रिटन आणि अमेरिकेनंतर वेस्ट इंडीज, फ्रान्स, हाँगकाँग, जर्मनी, सिंगापूर, लक्जमबर्ग, कॅमेन आयलँड आणि बहामास हे देश आहेत.

बांग्लादेशची रक्कम घटली

स्विस बँकांमध्ये ज्या देशांच्या ग्राहकांच्या रक्कमेत घट झालीय त्यामध्ये अमेरिका आणि ब्रिटन देखील सामील आहे. तर बांग्लादेशातील व्यक्ती आणि कंपन्यांद्वारा जमा केलेल्या रक्कमेमध्ये देखील 2020 मध्ये घट झाली आहे. मात्र, पाकिस्तानी ग्राहकांची रक्कम दुप्पट होऊन 64.20 कोटी स्विस फ्रँक झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT