India–Russia sakal
ग्लोबल

India–Russia : रशियाच्या लष्करी सेवेतून भारतीयांची मुक्तता;भारत सरकारची मागणी मान्य, मायदेशात पाठविण्याचीही तयारी

रशियाच्या लष्करात भारतीयांची भरती करणे थांबविण्याची भारत सरकारची मागणी रशियाने मान्य केली असून अद्यापही रशियाच्या सैन्यात असणाऱ्या भारतीयांना माघारी पाठविले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को : रशियाच्या लष्करात भारतीयांची भरती करणे थांबविण्याची भारत सरकारची मागणी रशियाने मान्य केली असून अद्यापही रशियाच्या सैन्यात असणाऱ्या भारतीयांना माघारी पाठविले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेवेळी मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

भारत-रशिया वार्षिक परिषदेसाठी मोदी हे दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आले आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सोमवारी मध्यरात्री मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चा झाली. रशियाने त्यांच्या सैन्यदलात तेथे राहणाऱ्या भारतीय युवकांना सामील करून घेतले आहे. युक्रेनबरोबरील युद्धात काही जणांचा मृत्यूही झाला आहे. याबाबत भारताने रशियाकडे वारंवार चिंता व्यक्त केली होती. पुतीन यांच्याबरोबरील चर्चेत मोदी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. भारताच्या या काळजीची दखल घेत रशियाने त्यांच्या लष्करात ‘सपोर्ट स्टाफ’ म्हणून रुजू असलेल्या सर्व भारतीयांना सेवेतून मुक्त करण्याचे मान्य केले आहे. तसेच, या भारतीयांना माघारीही पाठविण्याची तयारी रशियाने दर्शविली आहे.

मोदींकडून पुतीन यांचे कौतुक

पंतप्रधान मोदींनी रशियातील भारतीयांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी रशिया हा भारताचा सार्वकालिन मित्रदेश असून पुतीन यांच्या नेतृत्वाखाली भारत-रशिया मैत्री दृढ झाली आहे, असे कौतुकोद्गार काढले. युक्रेन युद्धावरून रशियाला एकटे पाडण्याचा प्रयत्न पाश्‍चिमात्य देश करत असताना मोदींनी पुतीन यांची स्तुती केली आहे. मोदी म्हणाले,‘‘रशिया हा भारताचा विश्‍वासार्ह मित्र आहे. रशियाच्या हिवाळ्यात तापमान कितीही ‘मायनस’ असले तरी, भारत-रशिया मैत्री कायम ‘प्लस’मध्ये असते. पुतीन यांनी त्यांच्या दोन दशकांच्या नेतृत्वाच्या काळात ही मैत्री नव्या उंचीवर नेली आहे.

रशियात दोन वकीलाती उघडणार

भारत आणि रशियादरम्यान पर्यटनाला चालना देण्यासाठी रशियातील कझान आणि याकेतेरिंगबर्ग या दोन ठिकाणी वकीलात उघडणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी आज जाहीर केले. सध्या रशियामध्ये सेंट पीटर्सबर्ग आणि व्लादिव्होस्तोक या दोन शहरांमध्ये भारताची वकीलात आहे. पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच व्यापारवृद्धीसाठीही याचा फायदा होईल, असे मोदींनी भारतीय समुदायाशी संवाद साधताना सांगितले. याकेतेरिंगबर्ग हे रशियातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर असून ते मोठे व्यापार केंद्र आहे. कझान हे रशियाचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. याच शहरात येत्या ऑक्टोबरमध्ये ‘ब्रिक्स’ परिषद होणार आहे.

जगाला वर्चस्वाची नाही, तर परस्पर सहकार्याची गरज आहे. भारताने कायमच सहकार्याचीच भाषा केली आहे. १४० कोटी भारतीयांनी विकसित भारताच्या स्वप्नावर विश्‍वास ठेवल्यानेच भारताची प्रगती झाली आहे. जनता ज्यावेळी विश्‍वास ठेवते, त्यावेळी मोठी उद्दीष्ट्ये साध्य करता येतात.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : करमाडमध्ये टोमॅटो दरावरून शेतकऱ्यांचा उद्रेक

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT