Death Body
Death Body Sakal
ग्लोबल

चीनचा निर्लजपणा ; भारतात जळणाऱ्या चितेची मांडली थट्टा

वृत्तसंस्था

बीजिंग : चीनमधील सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या बलशाली आघाडीकडून भारताच्या कोरोना हाताळणीची खिल्ली उडविण्यात आली आहे. अध्यक्ष शी जिनपींग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पाठवून सहानुभूती व्यक्त केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेईबो या सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून एक पोस्ट टाकण्यात आली.

भारतामधील स्मशानभूमीतील सामुहिक अंत्यसंस्काराचे छायाचित्र त्यासाठी वापरण्यात आले. त्याच्या बाजूला चीनने गेल्या आठवड्यात सोडलेल्या प्रक्षेपकाचे छायाचित्र जोडण्यात आले. त्यास देण्यात आलेल्या ओळी मानवतेवरील संकटाची कुचेष्टा करणाऱ्या होत्या. जेव्हा चीन एखादी गोष्ट प्रज्वलित करतो विरुद्ध भारत जेव्हा असे करतो असे त्याखाली नमूद करण्यात आले होते.

चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय राजकीय आणि विधी व्यवहार आयोगाकडून त्यांच्या वेईबो अकाऊंटवर शनिवारी ही पोस्ट टाकण्यात आली. नंतर ती हटविण्यात आली.

भारतामधील कोरोनाच्या जागतिक साथीबाबत चिंता वाटते, असे जीनपिंग यांनी शुक्रवारी मोदी यांना कळविले होते. चीनने गेल्या महिन्यात भारताला वैद्यकीय साहित्याची मदतही केली होती. ही पोस्ट काही वेळात व्हायरल झाली. चीनमधील ऑनलाइन जगताचे वार्तांकन करणाऱ्या चायना डिजिटल टाईम्सनुसार चायनीज पोलिस ऑनलाइन, तियानजीन महापालिका सरकारी वकील कार्यालय अशा संस्थांच्या अधिकृत अकाउंटवरूनही खिल्ली उडविण्यात आली. त्यासाठी चीन फायर शाईन माऊंटन विरुद्ध भारतीय फायर शाईन माऊंटन असे शिर्षक देण्यात आले.

निर्णयप्रक्रियेतील संस्था

चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या रचनेत राजकीय आणि विधी व्यवहार आयोगाला महत्त्वाचे स्थान आहे. पोलिस अधिकारी, सरकारी वकील आणि न्यायालय यांच्याशी संबंधित घडामोडींवर हा आयोग देखरेख करतो. गुओ शेंगकून सध्या या आयोगाचे प्रमुख आहेत. सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय समितीच्या राजकीय शाखेचे ते सदस्य आहेत. निर्णयप्रक्रियेत या दोन संस्थांना महत्त्वाचे स्थान असते.

चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या राजकीय आणि विधी व्यवहार आयोगाने त्यांच्या वेईबो अकाऊंटवर शनिवारी टाकलेली पोस्ट.

वेईबो अकाऊंटवर शनिवारी टाकलेली पोस्ट.

स्टुडीओ इन्सेंडोमुळे पोस्ट मिळाली

राजकीय आणि विधी व्यवहार आयोगाची पोस्ट काही वेळात व्हायरल झाली. त्यानंतर ती लगेच डिलीट करण्यात आली. हाँगकाँगच्या पाठिंब्यासाठी सुरु करण्यात आलेल्या स्टुडीओ इन्सेंडोने या पोस्टचा स्क्रीनशॉट आपल्या अधिकृत अकाऊंटवर पोस्ट केला. त्यामुळे ही पोस्ट मिळू शकली.

लंडनस्थित पत्रकाराकडून दखल

लंडनस्थित पत्रकार आणि संशोधक मेंगयू डाँग यांनी या ट्विटची तातडीने दखल घेऊन त्याविषयी नाराजी व्यक्त केली. भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची खिल्ली उडविणे ही कल्पना एखाद्याला चांगली वाटू शकते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT