Virtual Meta influencer  sakal
ग्लोबल

कायरा कोण आहे? जाणून घ्या Virtual Meta influencer म्हणजे काय?

सोशल मीडियावर एक लाख फॉलोवर्स असणारी कायरा ही भारतातील पहिली व्हर्च्युअल मेटा इन्फ्लुएंसर बनली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या जग खुप पुढे गेलंय. या २१ व्या शतकात तंत्रज्ञानाच्या प्रगतीने माणूस खूप पुढे गेलाय. सोशल मीडियावर असे अनेक उदाहरणे समोर येतात की जे अचंबित करणारे असतात. अशातच सोशल मीडियावर मेटा इन्फ्लुएंसर कायरा प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक लाख फॉलोवर्स असणारी कायरा ही भारतातील पहिली व्हर्च्युअल मेटा इन्फ्लुएंसर (Virtual Meta influencer) बनली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का व्हर्च्युअल मेटा इन्फ्लुएंसर म्हणजे काय? आज आम्ही तुम्हाला या विषयी सविस्तर सांगणार आहोत.

व्हर्च्युअल मेटा इंफ्लुअंसर म्हणजे काय?

व्हर्च्युअल म्हणजे आभासी.एखादा आभासी व्यक्ती म्हणजे प्रत्यक्षात त्याचं अस्तित्व नाही पण त्याचं अस्तित्व निर्माण करुन त्याला लोक फॉलो करताहेत.त्यांच अस्तित्व असल्याचं मान्य करताहेत हळुहळू हे आभासी लोक सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होतात. अशा लोकांना व्हर्च्युअल मेटा इंफ्लुअंसर म्हणतात. (Meta Influencers) असे नाव देण्यात आले.

ही कायरा कोण आहे?
अलीकडेच एका भारतीय व्यक्तीने इंस्टाग्रामवर कायरा नावाचा मेटा इन्फ्लुएंसर लॉन्च केला आहे.जो एक प्रकारचा रोबोट अवतार आहे.या मेटा इन्फ्लुएंसरच्या मदतीने जाहीरात किंवा व्हिडीओ पोस्टमधून पैसे कमवता येणार. यापूर्वी इतर अनेक देशांनी व्हर्च्युअल मेटा इन्फ्लुएंसर लाँच केले आहे. आता या देशांच्या यादीत भारताचाही समावेश झाला आहे.

व्हर्च्युअल मेटा इंफ्लुअंसर चा हा प्रोजेक्ट हिमांशू गोयल यांच्या संकल्पनेतून आला.2019 पासून इंफ्लुअंसर मार्केटिंग स्पेसचा एक भाग असलेल्या चंदीगडच्या हिमांशूने अहमदाबादमध्ये एमबीए केले आणि 2020 मध्ये व्हर्च्युअल मेटा इन्फ्लुएंसर प्रोजेक्टची धुरा हाती घेतली. त्याने कायरा व्हर्च्युअल मेटा इन्फ्लुएंसरला डिसेंबर 2021 मध्ये लॉन्च केले. तरी अधिकृतपणे तिची तारीख जन्म 28 जानेवारी 2022 आहे.

देशात व्हर्च्युअल मेटा इन्फ्लुएंसर लॉन्च केल्यानंतर कायरा सोशल मीडिया युजर्समध्ये अतिशय लोकप्रिय झाली आहे. इंस्टाग्रामवर kyraonig नावाने हे अकाऊंट तयार होताच लोकांनी फॉलो करायला सुरुवात केली.तीचे जवळपास १ लाख फॉलोअर्स आहेत.

मेटा इन्फ्लुएंसर काय करते?

कायरा नावाच्या या आभासी अकाऊंटवरुन २१ पोस्ट टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कायराने 46 अकाऊंट फॉलो केले आहेत. कायराच्या अकाऊंटवर उपलब्ध माहितीनुसार 28 जानेवारीला पहिल्यांदा पोस्ट करण्यात आली होती. अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, कायरा ही मुंबईची रहिवासी आहे आणि ती स्वत:ला मॉडेल आणि प्रवासी म्हणून सांगते. कायराच्या अकाऊंटवर तिचे एक यूट्यूब चॅनल असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. ती या चॅनलवर छोटे छोटे व्हिडिओ टाकत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT