indias indigenous corona vaccine covaxin bharat biotech got permission in mexico
indias indigenous corona vaccine covaxin bharat biotech got permission in mexico  sakal
ग्लोबल

स्वदेशी लस पोहोचली उत्तर अमेरिकेत; आता 'या' देशात मिळाली परवानगी

रोहित कणसे

भारताची स्वदेशी कोरोना लस आता थेट उत्तर अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने यूएस आणि कॅनडासाठी ऑक्युजेन (Ocugen Inc) कंपनीशी करार केला आहे. ज्या अंतर्गत व्यापारीकरण कराराला हिरवा सिग्नल मिळाला आहे. याव्यतिरिक्त, स्वदेशी कोरोना लस Covaxin ला देखील मेक्सिकोमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

मेक्सिकोचे परराष्ट्र सचिव मार्सेलो एब्रार्ड यांच्याशी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती देताना बोर्डाचे अध्यक्ष डॉ. शंकर मुसुनुरी म्हणाले की, मेक्सिकोमध्ये कोवॅक्सिनचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी ते उत्साहित आहेत कारण तेथील अधिकाऱ्यांनी कोरोना साथी विरुद्धच्या लढ्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

ते म्हणाले की, सध्या 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आपत्कालीन वापरासाठी कोवॅक्सिनचा वापर करण्यास परवानगी देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. या कामगिरीसाठी त्यांनी भारत बायोटेक कंपनीचे आभार मानले.

नवी दिल्लीतील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) यांच्या संयुक्त विद्यमाने कोवॅक्सिन शोधणारी कंपनी, भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला यांनी सांगितले की, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा सह मेक्सिकोसाठी, ओक्यूजेन कंपनीसोबत भागीदारी केली आहे. तसेच ते म्हणाले की कोवॅक्सिन ही सर्व वयोगटांसाठी सुरक्षित आणि प्रभावी लस आहे. जागतिक स्तरावर वैज्ञानिक तपासण्यासह याबद्दल डेटा देखील आहे. ते म्हणाले की, आता उत्तर अमेरिकेत कोवॅक्सिनच्या व्यावसायिक उत्पादनाच्या दिशेने तंत्रज्ञानाच्या हस्तांतरण संबंधीत कामाला गती दिली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT