Delhi Violence : अमित शाह यांचे पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश

delhi hanuman jayanti violence amit shah directs delhi police to take necessary action
delhi hanuman jayanti violence amit shah directs delhi police to take necessary action esakal

दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिल्ली पोलिसांना जहांगीरपुरी हिंसाचारातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राष्ट्रीय राजधानीत अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी,असे निर्देश दिले असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गृहमंत्री जहांगीरपुरी घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना तसेच पोलीस, विशेष आयुक्त देपेंद्र पाठक (कायदा व सुव्यवस्था) यांच्याशी शनिवारी संवाद साधला. या अधिकार्‍यांनी सांगितले की, गृह मंत्रालय परिस्थितीचे मूल्यांकन करत राहील. त्यासोबतच दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाबाबत मंत्रालयाला या आधीच माहिती दिली आहे.

delhi hanuman jayanti violence amit shah directs delhi police to take necessary action
''..तर मी नाही म्हणणार नाही"; संघटनांवर बंदीबाबत शरद पवारांचे विधान

दिल्ली पोलिस आयुक्तांनी सोमवारी सांगितले की, शनिवारच्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत दोन्ही समुदायातील 23 संशयितांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या अंतर्गत दिल्ली पोलिसांची किमान 14 पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत.

भारतीय जनता पक्षा (BJP) वर केलेल्या आरोपांनंतर पक्षांमध्ये राजकीय दोषारोपाचा खेळ सुरू झाला आहे. याप्रकरणात भाजपकडून आरोप करण्यात आला होता की, घटनेतील मुख्य आरोपींपैकी एक हा आम आदमी पक्षाचा होता. तर हे आरोप फेटाळून लावत, AAP ने दावा केला आहे की दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था चांगली नाही आणि या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उत्तरे मागितली पाहिजेत ज्यांच्या अंतर्गत शहर पोलिस काम करतात, असे आपने म्हटले आहे.

delhi hanuman jayanti violence amit shah directs delhi police to take necessary action
"राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी?"; सचिन सावंतांचा खोचक टोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com