sakal
ग्लोबल

भारताचे अडकलेले ट्रक परतीच्या वाटेवर

नेपाळमध्ये पावसामुळे भूस्खलन; वाहतूक कोंडी, काठमांडूत शेकडो घरे पाण्यात

सकाळ वृत्तसेवा

काठमांडू: नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे दहा दिवसांपासून बंद असलेले रस्ते आता हळहळू मोकळे होत आहेत. त्यामुळे भारताचे ठिकठिकाणी अडकलेले सुमारे ८५६ मालट्रक परतीच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे बर्दघाट-मुगलिंग मार्गावरील वाहतूक वळवल्याने काठमांडूत पोचण्यासाठी २४ तासांपेक्षा अधिक काळ लागत आहे. भूस्खलनामुळे रस्ते बंद झाल्याने भारत-नेपाळ सीमेवरील सौनोली येथे मालट्रकच्या दहा ते बारा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या.

नेपाळचे अधिकारी दिलीप गिरी म्हणाले की, भूस्खलनामुळे रस्त्यात अडकून पडलेले ८५६ मालट्रक बाहेर काढण्यात आले असून ते बिहार, राजस्तान, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगण, हरियाना, पंजाब आणि जम्मू काश्‍मीरला रवाना केले आहेत. रस्ते खराब असल्याने मालट्रकची वाहतूक संथ झाली आहे. त्यामुळे काही तासांच्या प्रवासाला चोवीस तास लागत आहेत. वाहतूक सुरळीत झाली असली तरी वाहनांची कोंडी झालेली आहे. काल सकाळी किरकोळ भूस्खलनाचे प्रकार घडले. परंतु ते तातडीने दूर करण्यात आले.

नागधुंदा-नौबिस मार्ग खंड येथे भूस्खलन झाल्याने रस्ते अजूनही खराबच आहेत. नेपाळमधील भूस्खलनानंतर सौनोली सीमेवर मालट्रकची रांग लागली आहे. सोनोली ते नौतनवा टोल नाक्यांपर्यंत सुमारे १२ किलोमीटरचा जाम झाला आहे. नेपाळ प्रशासनाने भन्सार पार्किंगमध्ये जागा मोकळी केली असून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काठमांडूत मुसळधार पाऊस

राजधानी काठमांडूत मुसळधार पावसामुळे पूर आला असून ३८० हून अधिक घरांत पाणी शिरले आहे. सखल भागात पाणी साचल्याचे पोलिसांनी आज सांगितले. नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळच्या सैनिकांनी काल रात्री १३८ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. मनोहरा नदी, कडागरी, टेकू आणि बाल्खू क्षेत्रात नदीकाठच्या भागात बचावकार्य वेगाने राबवले. काठमांडू येथे नदीकाठच्या झोपडपट्टीत पाणी शिरले असून सर्व भाग जलमय झाला आहे. काठमांडूत चार तासात १०५ मिलीमीटर पाऊस पडला. पुरामुळे सुमारे ३८२ घरात पाणी गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

Marathi News Live Updates : लोकसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

Hardik Panyda Trade: २५ कोटीसह कर्णधारपदही मिळणार! हार्दिक पांड्यासाठी नवी फ्रँचायझी मैदानात; Mumbai Indians ला दिलीय अशी ऑफर, जी नाकारता येणार नाही...

SCROLL FOR NEXT