Corona.jpg 
ग्लोबल

चीनमध्ये पुन्हा कोरोनाची लाट उसळण्याचे संकेत

सकाळ डिजिटल टीम

बीजिंग : कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे जगभरात आत्तापर्यन्त ४ लाख २५ हजार ८६९ जणांचा मृत्यू झालेला आहे. तर ७६ लाख ५० हजार ६९६ नागरिकांना या विषाणूचा संसर्ग झालेला आहे. चीनच्या हुबेई प्रातांतील वुहान या शहरात सर्वप्रथम या विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यानंतर चीनने कडक टाळेबंदी अमलात आणत कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. मात्र आता चीनच्या बीजिंग शहरात पुन्हा कोरोनाने संक्रमित झालेले रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

चीनच्या हुबेई प्रातांतील वुहानमधील सीफूड मार्केटमध्ये मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात कोरोना या विषाणूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर चीनने संपूर्ण वुहान शहरात दोन महिन्यांहून अधिक काळ टाळेबंदी लागू करत, या विषाणूचे संक्रमण रोखण्यात यश मिळवले होते. पण चीनच्या बीजिंग शहरात पुन्हा कोरोनाचे  रुग्ण सापडल्याने काही भागात टाळेबंदी लागू केल्याची माहिती मिळाली आहे. चीनची राजधानी बीजिंगमधील एका मार्केट मध्ये ५१७ नागरिकांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर यापैकी ४५ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र या रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही बाह्य लक्षणे दिसली नसल्याचे या आरोग्य अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, प्रशासनाने बीजिंग शहराच्या काही भागात पुन्हा टाळेबंदी जाहीर केली आहे. या घटनेनंतर चीनमध्ये आता कोरोनाची दुसरी साथ लहर चालू झाल्याचे म्हटले जात आहे. 

बीजिंग मधील मांस संशोधन केंद्रात काम करणाऱ्या दोन नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले होते. या दोन नागरिकांनी शहरातील या मार्केटला भेट दिली असल्याचे नंतर समोर आल्यामुळे या भागातील नागरिकांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच बीजिंगच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच  शहरातील सर्व बाजारात गोमांस व मटण यांच्या व्यापारास निर्बंध घालण्याचे आदेश दिले होते.  

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चीनच्या वुहान शहरासह इतर कोणत्याही भागात कोरोनाचे रुग्ण आढळले नसल्याने, चीनने ताळेबंदीचे नियम शिथिल केले होते. त्यामुळे चीनमधील जनजीवन पुन्हा सामान्य होत असल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच, आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणा सजग झाल्या आहेत. चीनने याअगोदर दिलेल्या माहितीनुसार ८४ हजार २२८ कोरोना बाधित रुग्ण देशात आढळले होते. तर ४ हजार ६२८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.       

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT