ग्लोबल

इंडोनेशियात बस दरीत कोसळली, २६ जणांचा जागीच मृत्यू

सकाळवृत्तसेवा

जकार्ता : इंडोनेशियामधील जावा बेटावर पर्यटकांची बसचा भीषण अपघात झाला आहे. पर्यटकांची बस दरीत कोसळल्यामुळे तब्बल २६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३५ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पोलीस आणि बचाव पथकांनं गुरुवारी ही माहिती दिली. 

पोलीस प्रमुख एको प्रासेत्यो रोब्बियांतो यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांना याबाबतची आधिक माहिती दिली. ते म्हणाले की, दुर्घटनाग्रस्त बस पश्चिम जावा बेटावरील सुबांग शहरातून इस्लामी माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या एका तुकडीला घेऊन तासिकामलय येथील एका धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी निघाले होती, त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली. ते पुढे म्हणाले की,  सुमेदांग जिल्ह्यातील रस्ते उंचीवर आणि दळवणळणाचे आहेत. चालकाचं  बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस २० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघतात २६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  

ब्रेक निकामी -
रोब्बियांतो यांनी सांगितले की, ही दुर्घटना नेमकी का घडली? याचा पोलीस तपास घेत आहेत. यामधील जखमी प्रवाशांची चौकशी केली असता, त्यांनी बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती दिली.  

१३ जणांची प्रकृती अतिशय गंभीर - 
बचाव पथकाचे प्रमुख देदेन रिदवांसाह म्हणाले की, या गंभीर दुर्घटनेत २६ जणांचे मृतदेह आतापर्यंत मिळाले आहेत. तर जखमी असलेल्या ३५ जणांना उपचारासाठी जवळील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये १३ जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. बचावपथकाचे काम अद्याप सुरु असून अन्य लोकांचा तपास केला जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT