dengue sakal media
ग्लोबल

डेंगीच्या संसर्गाला रोखणार ‘चांगले डास’

डेंगीचा प्रसार होऊ लागला आहे. हा आजार ज्या डासांमुळे होतो, त्यांच्यातील विषाणू नष्ट करण्यासाठी इंडोनेशियाच्या संशोधकांनी डासांच्या नव्या प्रजातीची निर्मिती केली आहे

सकाळ वृत्तसेवा

जाकार्ता : डेंगीचा प्रसार होऊ लागला आहे. हा आजार ज्या डासांमुळे होतो, त्यांच्यातील विषाणू नष्ट करण्यासाठी इंडोनेशियाच्या संशोधकांनी डासांच्या नव्या प्रजातीची निर्मिती केली आहे. अशा ‘चांगल्या’ डासांमध्‍ये विशिष्ट प्रकारचे जिवाणू असतात, जे डेंगीसारख्या विषाणूंची वाढ डासांमध्ये होण्यापासून रोखतात. ‘वोल्बाशिया’ हा जिवाणू किटकांमधील ६० टक्के प्रजातींमध्ये नैसर्गिकपणे आढळतो.

या किटकांमध्ये काही प्रकारचे डास, माशा, पतंग आणि फुलपाखरे यांचा समावेश आहे. मात्र ‘जागतिक डास मोहीम’ (डब्लूएमपी)नुसार डेंगीच्या विषाणूचा वाहक असलेल्या ‘एडिस इजिप्सी’ या डासांमध्ये हा जिवाणू आढळत नाही. ‘डब्लूएमपी’ या स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भात संशोधन सुरू केले आहे. त्यांच्या संशोधक पुरवंती म्हणाल्या की, ‘आम्ही तत्त्वतः चांगल्या डासांची पैदास करीत आहोत.

विणीच्या काळात डेंगीचे वहन करणारे डास ‘वोल्बाशिया’ वहन करणाऱ्या डासांबरोबर जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्यांच्यापासून ‘वोल्बाशिया’ डासांची (चांगले डास) पैदास होईल. असे डास चावले तरी माणसांच्या शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही. ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठ व इंडोनेशियातील माडा विद्यापीठाच्या वतीने डासांवरील संशोधनास २०१७पासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार प्रयोगशाळेत केलेले वोल्बाशिया’ डास इंडोनेशियातील योगीआकर्ता शहरातील डेंगीच्या तापाची साथ असलेल्या भागात सोडले. या चाचणीतील निष्कर्ष ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या नियतकालिकामध्ये जून महिन्यात प्रसिद्ध झाले आहेत.

जगभरात दरवर्षी ४० कोटी रुग्ण

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) नुसार काही दशकांपासून डेंगीच्या संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढले आहे. जगातील निम्म्या लोकसंख्येला डेंगीचा धोका आहे. जगभरात दरवर्षी डेंगीचे दहा कोटी ते ४० कोटी रुग्णांची नोंद होते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

"डेंगीच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेले एडिस डासांचा प्रादुर्भाव जेथे वाढला आहे, तेथे हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे."

- अदी उतारिणी, मुख्य संशोधक, डब्लूएमपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT