ग्लोबल

नासाचे 'इनसाइट' यान पोहोचले मंगळावर

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क- नासाचे इनसाइट (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाइट यान मंगळ ग्रहावर उतरले. मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान बनवण्यात आले आहे.
 


ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना 19800 कि.मी. प्रति तास वेगाने जाणारे हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले. दरम्यान, इनसाइटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे.

 


मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान तयार करण्यात आले आहे. सहा महिन्यांच्या प्रवासानंतर इनसाइटने मंगळावर लँड केले. नासाच्या या प्रकल्पासाठी 1 बिलियन डॉलर म्हणजेच 70 अब्ज रुपये खर्च आला आहे. सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला 26 महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. परंतु, नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरू राहू शकेल अशी अपेक्षा आहे.
 

नासाने म्हटले आहे की, इनसाइट यान पृष्ठभागावर 10 ते 16 फुट खोल खड्डा करेल. यापूर्वीच्या मंगळ अभियानांच्या तुलनेत हे 15 टक्के अधिक खोल असेल. 2030 पर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजणे महत्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Rule Changes: लोनशी संबंधित हे 4 नियम आजपासून बदलले! CIBIL स्कोरमध्ये मोठा बदल; आता या गोष्टींसाठी चार्ज नाही

Minor Girl Incident : नाशिक जिल्हा अश्लीलतेच्या चर्तेतून बाहेर जात नाही, खरातनंतर खासगी व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलीबाबत उचललं चुकीचं पाऊल

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : पुण्यात अनधिकृत केबल्सवर कारवाई; पालिकेची धडक मोहीम सुरू

SCROLL FOR NEXT