interferon-beta 
ग्लोबल

कोरोनावरील उपचार पद्धतीत इंटरफेरॉन बिटा ठरतेय उपयुक्त

पीटीआय

लंडन - ब्रिटनमधील सायनरजेन या कंपनीने कोरोनावरील उपचार पद्धतीच्या प्रयोगिक चाचण्यांमध्ये यश मिळाल्याचा दावा केला असून यामुळे कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर होण्यापासून रोखली जाऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. प्रथिनांच्या वापरावर ही उपचार पद्धती अवलंबून आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सायनरजेन’च्या म्हणण्यानुसार, या उपचार पद्धतीत इंटरफेरॉन बिटा या प्रथिनाचा वापर केला जातो. विषाणू संसर्ग होतो त्यावेळी हे प्रथिन शरीरात निर्माण होते. उपचारांदरम्यान हे प्रथिन नेब्युलायझरच्या साह्याने थेट फुफ्फुसांत सोडले जाते. यामुळे प्रतिकारक्षमता वाढून रोगाचा प्रतिकार होईल. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांसाठी ही उपचार पद्धती फायदेशीर ठरू शकते, असा दावा या कंपनीचे प्रमुख रिचर्ड मार्सडन यांनी केला आहे. प्रायोगिक चाचण्यांमध्ये या उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्णांची स्थिती सुधारल्याचे दिसून आल्याचेही ते म्हणाले. 

चाचणीचे निष्कर्ष

  • रुग्णांची स्थिती सुधारली
  • श्‍वास घेण्यातील अडथळा कमी
  • रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी तिपटीने कमी झाला

इंजेक्शनच्या स्वरुपातील हे औषध श्‍वासामार्फत घेऊन फुफ्फुसांची ताकद वाढविते आणि कोरोनापासून लवकरात लवकर मुक्तता देते, असे चाचणीतून दिसून आले आहे. 
- टॉम विल्कीन्सन, संशोधक

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभा खासदारांच्या तुलनेत राज्यसभेचे खासदार अडीच पट श्रीमंत; कोणाकडे सर्वाधिक संपत्ती? नवीन यादी जाहीर

Beed Corruption: माजलगाव सहाय्यक निबंधक कार्यालयात एसीबीची धाड; सहाय्यक निबंधकासह तिघांना रंगेहात पकडले, सावकारकी परवाना अन्..

Pune Rescue: पुण्यात थरारक रेस्क्यू! दोन महाकाय पाइपमध्ये अडकलेल्या रानगव्याला अखेर जीवनदान; मूक प्राण्यासाठी ‘देवदूत’सिंहगड रस्ता धावले

Modi Cabinet Reshuffle : मोदी सरकार मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल?; जुलैचा तिसरा आठवडा ठरणार महत्वाचा; संभाव्य नावे समोर

Latest Marathi News Live Update : राज्यात 5 दिवस अतिमुसळधार पाऊस; कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT