corona news file photo
ग्लोबल

जगात कोरोना बाधितांची संख्या तीस कोटींवर

ब्रिटन, अर्जेंटिना, इटलीत देखील लाखापेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळून आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : युरोप,अमेरिकेनंतर आता भारतात देखील कोरोनाचे रुग्ण (Corona Patient) वाढत चालले आहेत. गेल्या चोवीस तासात जगभरात सुमारे २७ लाख रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ६३६९ जणांचा मृत्यू (Corona Death) झाला आहे. काल अमेरिकेत ८ लाख ४९ हजार जणांना तर फ्रान्समध्ये ३.२८ लाख जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. ब्रिटन, अर्जेंटिना, इटलीत देखील लाखापेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळून आले आहे. (International Corona News)

जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येने ३० कोटींचा पल्ला पार केला आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉनमुळे संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सक्रिय रुग्णांचा आकडा हा दहा कोटी होता. पुढील सहा महिन्यांत हा आकडा वीस कोटींवर पोचला. त्याचवेळी दहा कोटी रुग्णसंख्या होण्यासाठी केवळ पाच महिन्यांचा कालावधी लागला होता. अमेरिकेच्या आरोग्य तज्ञांनी भारतात फेब्रुवारीत तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स ॲड इव्हॅल्यूशनचे संचालक ख्रिस्तोफर मरे यांच्या मते, फेब्रुवारीत भारतात कोरोनाचे दररोज पाच लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील. डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंट कमी धोकादायक राहील, असेही नमूद केले आहे.

अमेरिका, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियात रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. अमेरिकेचे प्रमुख आरोग्य तज्ञ डॉ. ॲथनी फॉसी यांनी म्हटले, की सक्रिय रुग्ण वाढले असले तरी अमेरिकेसह जगभरातील रुग्णांचा दवाखान्यात भरती होण्याचा दर हा कमीच राहिला आहे. दुसरीकडे ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी बूस्टर डोस ओमिक्रॉनविरोधात प्रभावी असल्याचे म्हटले आहे.

जगातील कोरोना स्थिती

३०.३७ कोटी

एकूण बाधित

२५.८२ कोटी

बरे झालेले

४ कोटी

सक्रिय रुग्ण

५४.९७ लाख

एकूण मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT