Internet Explorer browser officially shut down today
Internet Explorer browser officially shut down today  sakal
ग्लोबल

‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ कायमस्वरुपी ‘शट डाऊन’

सकाळ वृत्तसेवा

सॅनफ्रान्सिस्को : जगाला इंटरनेटच्या दुनियेची ओळख करून देणारे ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ हे ब्राऊजर आज अधिकृतरित्या बंद झाले. आधी जाहीर केल्यानुसार, मायक्रोसॉफ्ट कंपनीने ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ या ब्राऊजरचा सपोर्ट बंद केला आहे. यामुळे ‘ब्लॅक बेरी’, डायल-अप मोडेम, पाम पायलट्स अशा इतिहासजमा झालेल्या ॲप्लिकेशनच्या यादीत ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’चाही समावेश झाला आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने ऑगस्ट १९९५ मध्ये ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ लाँच केले होते. तेव्हापासून २०१३ पर्यंत या कंपनीने ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’चे ११ व्हर्जन बाजारात आणले. मात्र, २०१५ मध्ये या कंपनीने ‘एज’ हे नवे ब्राऊजर बाजारात लाँच करून ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ला अलविदा करण्याची तयारी सुरु केली होती. १५ जून २०२२ ला ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ बंद करणार असल्याचे या कंपनीने गेल्याच वर्षी जाहीर केले होते. त्यामुळे आजची त्यांची घोषणा अपेक्षितच होती. ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ या ब्राऊजरचा वापर करताना तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होती.

मायक्रोसॉफ्टच्या ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ने सुरुवातीच्या काळात इंटरनेट विश्‍वावर वर्चस्व निर्माण केले होते. या ब्राऊजरच्या माध्यमातूनच जगभरातील अनेकांना इंटरनेटची ओळख झाली होती. ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ म्हणजेच इंटरनेट अशीच त्याची ओळख बनली होती. नंतर मात्र इतर विविध आणि अद्ययावत ब्राऊजर निर्माण झाले आणि त्या स्पर्धेत ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ मागे पडत गेले. ‘विंडोज्‌’च्या मदतीने वर्चस्व निर्माण करण्याच्या मायक्रोसॉफ्टच्या प्रयत्नांना कायदेशीर मार्गाने रोखले गेले आणि त्यांची मक्तेदारी संपली. यानंतर मोझिला फायरफॉक्स, ओपेरा, गुगल क्रोम या ब्राऊजरचे युग सुरु झाले. या युगात टिकून राहण्यासाठी मायक्रोसॉफ्टने सात वर्षांपूर्वी ‘एज’ ब्राऊजर लाँच केले.

‘एक्सप्लोअरर’ची वाटचाल

  • १९९५ : स्पायग्लास मोझाइकमध्ये सुधारणा करत मायक्रोसॉफ्टने ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ बाजारात लाँच केले.

  • १९९७ ते २००१ : वर्चस्वाचा आणि न्यायालयीन लढाईचा काळ

  • २००३ ते २००६ : अनेक तांत्रिक अडचणी, आणि नवे व्हर्जन लाँच

  • २००६ ते २००९ : इतर ब्राउजर सुरु झाल्याने पडझडीला सुरुवात

  • २००९ ते २०१४ : सुधारणा करून स्पर्धेत टिकण्याचा प्रयत्न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT