Ruhollah Zam 
ग्लोबल

इराण सरकारने पत्रकाराला दिली फाशी; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

सकाळन्यूजनेटवर्क

तेहरान- इराणमधील पत्रकार रुहोल्ला झाम यांना शनिवारी सकाळी फाशी दिल्याचे वृत्त इराणच्या दूरचित्रवाणी सेवा आणि देशातील वृत्तसेवा ‘आयआरएनए’ने दिली आहे. इस्मामिक सरकारला धोका पोहोचवल्या प्रकरणी इस्लामच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. झाम यांना मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आली होती. झाम फ्रान्स सरकारचे हेर आहेत, असा आरोप त्यांच्यावर Iran's Revolutionary Guards ने केला होता.

GPS शिवाय शत्रूला संपवू शकते HAMMER; राफेलसोबत असणार खास मिसाईल

झाम यांच्या ऑनलाइन लिखाणामुळे इराणमध्ये 2017 मध्ये अर्थव्यवस्थेविरोधात देशव्यापी आंदोलन झाले, या आरोपावरून त्यांना हद्दपारही करण्यात आले होते. जून महिन्यात न्यायालयाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. पृथ्वीवरील भ्रष्टाचाराचा गुन्हा त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. इराणच्या सरकारला धोका पोचवणाऱ्या किंवा हेरगिरीच्या कृत्यात सहभागाबद्दल हा आरोप इराणमध्ये कायम ठेवण्यात येतो. झाम यांच्या संकेतस्थळावरील आणि ‘टेलिग्राम’वरील त्यांच्या चॅनेलवरील माहितीमुळे आंदोलन भडकण्यास आणि इराणमधील शिया राजवटीला आव्हान दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

रुहोल्ला झाम यांना अनेक देश संरक्षण देत होते, असा दावा राज्य टेलिव्हिजनने केला आहे. झाम यांच्यावर पृथ्वीवरील "corruption on earth" भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इराणच्या कायद्यानुसार हा सर्वात मोठा आणि गंभीर गुन्हा आहे. झाम यांना जून महिन्यात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. झाम शत्रू देश अमेरिकेसोबतही काम करत असल्याचा आरोप इराणने केला होता. 

चीन लडाखमध्ये वाढवतोय ताकद; सैनिकांना दिले 'आयर्नमॅन सूट'

इराणमध्ये डिसेंबर 2017 आणि जानेवारी 2018 मध्ये अर्थव्यवस्थेविरोधात देशव्यापी आंदोलन झाले होते. त्यात झालेल्या हिंसाचारात 25 लोकांचा मृत्यू झाला होता. या आंदोलनासाठी झाम यांचे ऑनलाइन लिखाणा कारणीभूत होते. झाम टेलिग्रामवर Amadnews नावाचे चॅनेल चालवायचे. इराण सरकारच्या मागणीनंतर टेलिग्रामने हे चॅनेल काढून घेतले होते. या चॅनेलमुळे सशस्त्र उठावाला चालना मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

Monday Morning Breakfast Recipe: ना लसूण, ना कांदा घरच्या घरी झटपट बनवा व्हेगन कबाब, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT