Iran-Israel Row esakal
ग्लोबल

Iran-Israel Row: भारताच्या दिशेने येणारे व्यापारी जहाज इराणने पकडले; जहाजावरील १७ भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न

Iran-Israel Row: पोर्तुगालचा ध्वज असलेले ‘एमएससी ॲरिस’ हे जहाज लंडनमधील झोडियाक मेरिटाईम या कंपनीची असल्याचे समजते.

Sandip Kapde

Iran-Israel Row: इस्राइल आणि इराणमधील तणाव वाढल्यानंतर पश्चिम आशियामध्ये आणखी एका युद्धाच्या अफवा पसरल्या आहेत. दरम्यान, इराणच्या निमलष्करी दलाने इस्रायली अब्जाधीश इयाल ओफरचे मालवाहू जहाज ताब्यात घेतले आहे. आता या जहाजाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या जहाजावर सतरा भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. जहाजावरील भारतीयांच्या सुरक्षित सुटकेसाठी भारत दिल्ली आणि तेहरानमधील राजनैतिक माध्यमांद्वारे इराणच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.

मीडिया रिपोर्टमध्ये असाही दावा केला जात आहे की हे जहाज भारताच्या दिशेने येत होते आणि त्यात एकूण 25 क्रू मेंबर्स आहेत. इराणचे निमलष्करी दल असलेल्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इस्राईलशी संबंधित मालवाहू जहाज ताब्यात घेतल्याने या भागामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. हे जहाज भारताच्या दिशेने येणार होते असे बोलले जाते इराणचे सैनिक हेलिकॉप्टरमधून या जहाजावर उतरल्याचे समजते.

पोर्तुगालचा ध्वज असलेले ‘एमएससी ॲरिस’ हे जहाज लंडनमधील झोडियाक मेरिटाईम या कंपनीची असल्याचे समजते. ही कंपनी इस्रायली अब्जाधीश इयाल ओफेर यांच्या मालकीची आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने मात्र त्यावर कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. इराण २०१९ पासून सातत्याने मालवाहू जहाजांना लक्ष्य करत आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ ओमानचे आखात असून हे पर्शियन आखाताचे मुख समजले जाते. जगातील तेलाचा व्यापार येथून चालतो. संयुक्त अरब अमिरातीचा पूर्व किनारा असलेल्या फुजैराह येथून तेलाचा व्यापार होतो. मागील काही दिवसांपासून या किनाऱ्यांवर देखील हल्ले होऊ लागले आहेत. येथील हल्ल्यासाठी अमेरिकेने इराणलाच जबाबदार धरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT