Iran Israel Conflict 
ग्लोबल

Gold Silver Rates : इराण-इस्त्राइल यांच्यात टेन्शन वाढलं... सोनं-चांदी अजून महागणार?

Iran Israel Conflict : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. जागतीक स्तरावर तसेच भारतात देखील सोन्याच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे.

रोहित कणसे

Iran Israel Conflict : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. जागतीक स्तरावर तसेच भारतात देखील सोन्याच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. यासोबतच चांदीच्या किंमती देखील रेकॉर्ड ब्रेक वाढल्या आहेत. यातच आता इराण-इस्त्राइल यांच्यात संघर्ष पेटला असून याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तणावाच्या स्थितीत सोन्या-चांदीच्या किंमती अजून वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मार्च महिन्यात १० टक्के वाढ झाल्यानंतर एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरात रेकॉर्ड ब्रेक वाढ पाहायला मिळाली. सोन्याची किंमत वाढण्यास सुरुवात ही फेड रिझर्व्हने जारी केलेल्या महागाई आकड्यांनंतर मिळाली आहे. यासोबतच इस्त्राइल आणि इराण यांच्यातील तणाव वाढल्याने देखील सोने आणखी महागण्याच्या शक्यता आहेत.

एप्रिल महिन्यात सोन्याचे दर दिल्लीत २४ कॅरेटसाठी ७४ हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे. एप्रिलमध्ये नऊ दिवसांमध्ये ७०६०५ रुपये प्रति १० ग्रॅम वरून ३७६५ रुपयांची वाढ पाहायला मिळाली असून तो आता ७४,३७० रुपये प्रति ग्रॅम वर पोहचला आहे. याप्रमाणे चांदीचे भाव देखील वाढले आहेत. एक एप्रिल रोजी सराफा बाजारात ७८ हजार रुपये प्रति किलो भाव होता आता तो ८५ हजार ५०० प्रति किलो झाला आहे.

सोने आणि चांदी ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अशा परिस्थितीत, युद्ध किंवा वाढत्या महागाईच्या काळात लोक जास्त धोका न पत्करता सोने-चांदीसारख्या धातूंमध्ये गुंतवणूक करतात. आता इराण-इस्त्राइल यांच्यात युद्ध सुरू झाल्याने सोन्याच्या मागणी वाढल्याने किंमती देखील वाढत आहेत.

भारतात दागिन्यांची मागणी वाढणार आहे कारण काही दिवसांत लग्नांचा हंगाम सुरू होत आहे. यादरम्यान सोने आणि चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. २०२२ मध्ये १,०८१.९ टन आणि २०२३ मध्ये १,०३७.४ टन ची रेकॉर्डब्रेक खरेदी झाली होती, ज्यामुळे २०२४ मध्ये देखील रेकॉर्ड खरेदी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून सोने आणि चांदींच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT