Iran vows to avenge deadly Syria strike blamed on Israel latest Marathi News  
ग्लोबल

Iran-Israel Conflict : योग्यवेळी बदला घेतला जाईल...; सीरियामधील हल्ल्यात सात जणांच्या मृत्यूनंतर इराणचा इशारा

गाझामधील युद्धात हमासला मदत करणाऱ्या इराणच्या सैनिकांना व अधिकाऱ्यांना इस्राईलने अनेकदा लक्ष्य केले आहे.

रोहित कणसे



तेहरान, ता. २ (पीटीआय) : सीरियामध्ये झालेल्या हल्ल्यात दमास्कस शहरातील इराणची वकिलात उद्ध्वस्त होऊन त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याबद्दल इराण सरकारने संताप व्यक्त केला आहे. हा हल्ला इस्राईलनेच केला असल्याचा संशय असून योग्यवेळी बदला घेतला जाईल, असा इशारा इराणने दिला आहे.

गाझामधील युद्धात हमासला मदत करणाऱ्या इराणच्या सैनिकांना व अधिकाऱ्यांना इस्राईलने अनेकदा लक्ष्य केले आहे. यासाठी त्यांनी सीरिया आणि लेबनॉन या शेजारी देशांमध्येही लक्ष्यभेदी हल्ले केले आहेत. सोमवारी इस्राईलने दमास्कसमध्ये हल्ला करताना इराणच्या वकिलातीवरच क्षेपणास्त्रे टाकली. या हल्ल्यात इराणच्या सैन्यदलातील दोन अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला. इस्राईलने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली तरीही संशयाची सुई त्यांच्याच दिशेने आहे. मारले गेलेले अधिकारी सीरियामधील हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेला मदत करत असल्याचा इस्राईलचा आरोप होता. या हल्ल्याचा निश्‍चितपणे बदला घेतला जाईल, असा इशारा हिज्बुल्लानेही दिला आहे.

इराण सरकारनेही इस्राईलचा बदला घेण्याची भाषा केली आहे. त्यांनी सोमवारी रात्रीच अमेरिकेला एक महत्त्वाचा संदेश पाठविला असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचीही तातडीची बैठक बोलाविण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT