Iran Vs Israel Military Power 
ग्लोबल

Iran Vs Israel Military Power : इराण अन् इस्त्राइलमध्ये युद्ध झाल्यास कोण जिंकेल? जाणून घ्या कोण किती पॉवरफुल

Iran-Israel tensions : इराणन ड्रोन हल्ल्यानंतर इस्त्राइलाला खुले आव्हान दिले आहे.

रोहित कणसे

इराणन ड्रोन हल्ल्यानंतर इस्त्राइलाला खुले आव्हान दिले आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण इस्त्राइलवर हल्ला करणार असल्याची शक्यता मागील काही दिवसांपासून व्यक्त केली जात होती. दरम्यान इराणने हे हल्ले इस्त्राइलने आपल्या दुतावासावर केलेल्या हल्ल्याचा बदला असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे इस्त्राइल देखील इराणला प्रत्तुत्तर देण्याची तयारी करत आहे. या वादात अमेरिका आणि ब्रिटेन देखील इस्त्राइलच्या बाजुने आहेत. दरम्यान इराण आणि इस्त्राइल या दोन देशांमध्ये अद्याप युध्द सुरू झाले नसले तरी ही तणावाची परिस्थीती पुढे युद्धात रुपांतरीत होऊ शकते.

दरम्यान येत्या काळात या दोन देशात युद्ध झाल्यास कोणता देश वरचढ ठरू शकतो? या बद्दल बोलायचे झाल्यास संरक्षण बजेटच्या बाबातीत इराण इस्त्राइलच्या खूपच मागे आहे. मात्र सैनिकांची संख्या इराणकडे जास्त आहे. रिपोर्टनुसार, इस्त्राइलचे संरक्षण बजेट २४.२ अब्ज डॉलर आहे, तर इराणचे संरक्षण बजट ९.९ अब्ज डॉलर इतके आहे. वायु दलाच्या क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास इस्त्राइलडे ६१२ विमाने आहेत तर इराणकडे ५५१ विमान आहेत. टँकच्या बाबतीत इराण इस्त्राइलच्या खूप पुढे असून इस्त्राइलकडे २२०० टँक आहेत आणि इराणकडे ४०७१ टँक आहेत.

नौदलाबद्दल बोलायचे झाल्यास इस्त्राइलकडे ६७ युद्धनौका आहेत थर इराणकडे १०१ युद्धनौका आहेत. याशिवाय इस्त्राइलकडे ४३ हजार हत्यारबंद वाहने तर इराणकडे ६५ हजार अशी वाहने आहेत. सैनिकांच्या संख्येत इराण इस्त्राइल्या पुढे आहे, इस्त्राइलकडे १.७३ लाख सैनिक आहेत तर इराणकडे ५.७५ लाख सैनिक आहेत. याशिवाय इस्त्राइलकेड ४.६५ रिझर्व्ह सैनिक आहेत तर इराणकडे असलेल्या अशा सैनिकांची संख्या ३.५० लाख इतकी आहे.

इराणपेक्षा इस्त्राइल भारी

आंतरराष्ट्रीय मीडियी रिपोर्ट्सनुसार इस्त्राइलकडे सध्या ८० अणुबॉम्ब आहेत तर इराणकडे अधिकृतरित्या कोणताही अणुबॉम्ब नाहीये. त्यामुळे या बाबतीत इस्त्राइल इराणपेक्षा ताकतवर आहे. अमेरिकन मीडियानुसार इराणनने मोठ्या प्रमाणात यूरेनियम गोळा केले आहे. तसेच इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. याशिवाय यूरेनियम वापरून इराण आपल्याकडील हत्यारे अपग्रेड करत आहे.

इस्त्राइल क्षेत्रफळाच्या टृष्टीने अगदी छोटा देश आहे मात्र त्याचे सामर्थ खूप जास्त आहे. इस्त्राइलकेड लेटेस्ट फायटर प्लेन, आयर्न डोम सारखी अत्याधुनिक मिसाइल सुरक्षा प्रणाली आहे. इस्त्राइलकडे आयडीएफ सारखी जगातील सर्वात ताकतवान सेना आहे. सायबर युद्धात निष्णात असलेले इस्त्रायली सैन्य तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत पुढारलेले आहे.

तर दुसरीकडे इराणकडे सैन्य शक्ती आणि शस्त्रास्त्रे भरपूर प्रमाणात आहेत. इराण आपल्या बॅलेस्टीक मिसाइल्सचा वापर आपल्या शत्रूंविरोधात करू शकतो. इराणने मागील काही वर्षांमध्ये ड्रोन तंत्रज्ञान आणि सायबर क्षमतांचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update : कुर्ल्यात इमारतीच्या पाचव्या माळ्याला आग

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT