Indian Coast Guard and Gujarat ATS seize 526 kg of heroin and methamphetamine from an Iranian boat

 

esakal

ग्लोबल

Iranian Boat Drug Seizure: तीन हजार कोटींच्या अमली पदार्थांची तस्करी करणारी इराणी नौका नारगोल किनाऱ्यावर

Iranian Boat Drug Seizure, 526 Kg Narcotics, ₹3,000 Crore: प्रकरणात भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने इराणी नौकेतून ५२६ किलो हेरॉईन व मेथाम्फेटामाइन जप्त केले. नौकेवरील पाच पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून विविध केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

महेंद्र पवार

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाई करत अरबी समुद्रात अमली पदार्थांची मोठी तस्करी उधळून लावली. लक्षद्वीपच्या पश्चिमेकडील भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रात २५ सप्टेंबर रोजी पकडण्यात आलेल्या इराणी नौकेतून तब्बल ५२६ किलो हेरॉईन आणि मेथाम्फेटामाइन जप्त करण्यात आले. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

गुजरात एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर तटरक्षक दलाने समुद्र आणि हवाई मार्गाने संशयित नौकेवर लक्ष ठेवले. त्यानंतर पाठलाग करून नौका अडविण्यात आली. नौकेवर असलेल्या पाच पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात नौकेचे नाव ‘आझाद’ असल्याचे समोर आले आहे. जप्त केलेल्या साठ्यात सुमारे ४०० किलो मेथाम्फेटामाइन आणि १२६ किलो हेरॉईन असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे.

कारवाईनंतर नौका, त्यावरील संशयित आणि जप्त अमली पदार्थ मुंबई येथे आणण्यात आले. विविध केंद्रीय तपास यंत्रणांकडून या प्रकरणाची संयुक्त चौकशी सुरू करण्यात आली असून, अमली पदार्थांच्या तस्करीमागील आंतरराष्ट्रीय नेटवर्क तसेच या साठ्याचा अंतिम लाभार्थी कोण होता, याचा शोध घेतला जात आहे

मुंबईतील प्राथमिक तपासानंतर पुढील तांत्रिक तपासासाठी जप्त नौका गुजरातमधील नारगोल किनाऱ्यावर आणण्यात आल्याची माहिती आहे. पालघर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या या किनाऱ्यावर नौकेची तपासणी आणि पुराव्यांचे संकलन करण्यात येत आहे. या कारवाईमुळे समुद्रमार्गे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या नेटवर्कचा तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Sugar Mill Opening : साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भातील राजु शेट्टींची मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन पाठराखण

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

Latest Marathi News Live Update : नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस काढल्याचा अखिल चित्रेंचा आरोप

Akola Water Crisis : अकोल्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासनाची तयारी काटेपूर्णा प्रकल्पातील मर्यादित साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच पर्यायी उपाययोजनांना गती

SCROLL FOR NEXT