Pak DG ISPR 
ग्लोबल

Pakistan: टार्गेट किलिंगमध्ये भारताचा हात? लष्करी अधिकाऱ्याचा दावा पाकिस्तानवरच उलटला, पाहा व्हिडिओ

पाकिस्तानची आतापर्यंत वाटचाल पाहता त्यांच्या आरोपांबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

कार्तिक पुजारी

इस्लामाबाद- इंटर-सर्व्हिस पब्लिक रिलेशनचे संचालक प्रमुख मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी केलेल्या दाव्यामुळे पाकिस्तान पुन्हा वादामध्ये अडकला आहे. चौधरी यांनी दावा केलाय की, गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानमध्ये होत असलेल्या हत्यांमध्ये भारताचा सहभाग असल्याचे पुरावे मिळत आहेत आणि हे पुरावे नाकारण्यासारखे नक्कीच नाहीत.

पाकिस्तानने केलेल्या आरोपांमुळे जगातील काही देश भारताचा निषेध करत आहेत. मात्र, पाकिस्तानची आतापर्यंत वाटचाल पाहता त्यांच्या आरोपांबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तसेच पाकिस्तानला ट्रोल देखील केलं जात आहे. ( Indian involvement in targeted killings )

भारत जगातील अनेक देशांमध्ये हत्या घडवून आणत आहे. खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जर याची कॅनडामध्ये हत्या झाली. पाकिस्तानमधील हत्यांसाठी देखील भारत जबाबदार आहे, असं मेजर जनरल अहमद चौधरी म्हणाले होते. रावळपिंडीमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारताचा यात हात आहे याबाबतचे पाकिस्तानकडे दुर्लक्ष न करता येण्यासारखे पुरावे आहेत, असंही ते म्हणाले होते.

भारतामध्ये सध्या निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे भारत सरकार पाकिस्तानबाबत आक्रमक पवित्रा घेत आहे. भारत पाकिस्तान विरोधी धोरण राबवत आहे. भारत नियंत्रण रेषेवर कुरापती करत आहे. त्यांच्या देशातील मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी ते असं करत आहेत. एलओसीवर भारताकडून वारंवार उल्लंघन होत आहे, असं चौधरी म्हणालेत.

चौधरी यांनी अनेक आरोप केले असले तरी त्यांच्यावर संशय घेतला जात आहेत. शिवाय अनेक देशांनी पाकिस्तानची थट्टा देखील केली आहे. पाकिस्तानच्या दाव्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पाकिस्तानने कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत, केवळ आरोप केले आहेत. शिवाय पाकिस्तानने केलेल्या आरोपांची वेळ, भारतातील लोकसभा निवडणुका यांना जोडून या आरोपांकडे पाहिलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST 2.0 : नवी गाडी घेताय? जरा थांबा! सेकंडहँड गाड्याही स्वस्त, 'ही' कंपनी देत आहे २ लाखांपर्यंत सूट...

IPhone 17 Crowd: आयफोन १७ विक्री सुरू; बीकेसीच्या स्टोअरबाहेर तुफान गर्दी, रांगेत धक्काबुक्की अन् हाणामारीचा थरार!

RBI Recruitment 2025: रिझर्व बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ग्रेड-बी ऑफिसर पदासाठी १२० जागांची भरती सुरू; जाणून घ्या पगार आणि अर्ज प्रक्रिया

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Latur News: प्रसूतीसाठी दाखल झालेल्या माता अन् बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT