Imran Khan 
ग्लोबल

लादेनला कसं ठार केलं? आमच्यामुळेच ते शक्‍य झालंय..! 

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : पाकिस्तानने मदत केली, म्हणूनच अमेरिकेवर हल्ला करून संपूर्ण जगाला हादरवणारा दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार मारण्यात यश आले, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल (सोमवार) केला. इम्रान खान सध्या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एका मुलाखतीमध्ये त्यांनी असा दावा केला आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी खान येथे आले आहेत. 'फॉक्‍स न्यूज'ने घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना लादेनविषयी प्रश्‍न विचारण्यात आले. त्यावेळी खान म्हणाले, "ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा आम्हीच अमेरिकेला कळविला. 'आयएसआय' या संस्थेने मेहनतीने ही माहिती मिळविली होती. यासंदर्भात तुम्ही 'सीआयए'लाही विचारू शकता. लादेनविषयी आम्ही अमेरिकेला फोनवरून कळविले होते.'' 

खान यांचा हा दावा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये या प्रकरणी पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेलाच खान यांनी छेद दिला आहे. अमेरिकी कमांडोंच्या पथकाने 2 मे, 2011 रोजी इस्लामाबादच्या जवळ असलेल्या अबोटाबाद येथे कारवाई करत लादेनला ठार मारले होते. 'लादेन पाकिस्तानमध्ये लपला होता, याची काहीही माहिती आम्हाला नव्हती', अशी भूमिका पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली होती. 

विशेष म्हणजे, 'सीआयए'ला लादेनचा पत्ता शोधण्यास मदत केल्याबद्दल पाकिस्तानी प्रशासनाने डॉ. शकील आफ्रिदी यांना तुरुंगात डांबले आहे. या प्रकरणी भाष्य करताना खान यांनी सारवासारव करण्याचाच प्रयत्न केला. आफ्रिदी यांची सुटका करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आग्रही आहेत. 'आफ्रिदी यांचा विषय पाकिस्तानी जनतेसाठी भावनिक आहे. आफ्रिदी हे अमेरिकेचे गुप्तहेर म्हणून काम करत असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली आहे', असे खान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : MS Dhoni च नाही तर कोलकाता नाईट रायडर्सच्या 'या' तीन खेळाडूंसाठी यंदा शेवटचं आयपीएल?

Narayangaon News : मोफत शस्त्रक्रियेमुळे शेतमजूर तरुण विवाहितेचे अंधकारमय जीवन झाले प्रकाशमय

Latest Marathi News Live Update : ऋषी वैद्य यांच्यावर जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाईची हाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये जाणारच! ड्यू प्लेसिस ते इरफान पठाण, १२ एक्सपर्टची भविष्यवाणी; तुमचे टॉप ४ कोणते?

Water Safety Importance : पाण्याची सुरक्षितता का महत्त्वाची? वॉटर प्युरिफायरची वाढती गरज

SCROLL FOR NEXT