isis claims responsibility for Sri Lanka bombings 
ग्लोबल

श्रीलंकेमधील बॉम्बस्फोटांची इसिसने स्वीकारली जबाबदारी

वृत्तसंस्था

कोलंबोः श्रीलंकेमध्ये रविवारी (ता. 21) झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटांमध्ये 321 जणांचा मृत्यू झाला असून, या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

श्रीलंकेत झालेल्या स्फोटांनी संपूर्ण देश हादरला असून, देशात सोमवारी (ता. 22) मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू करण्यात आल्याची घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेन यांनी केली आहे. श्रीलंकेत रविवारी (ता. 21) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 321 जणांचा मृत्यू झाला असून, 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 45 लहान मुलांसह 8 भारतीयांचा समावेश आहे. श्रीलंकन पोलिसांनी या बॉम्बस्फोटप्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक केली आहे. स्फोटांनी देश हादरल्यानंतर देशातत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. भारताकडून मदत म्हणून एअर इंडियाने 24 एप्रिलपर्यंत कोलंबोहून येणारी-जाणारी तिकीटे रद्द किंवा पुढची तारीख निवडल्यास त्यावर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीहून कोलंबोसाठी दररोज दोन विमानांचे उड्डाण होईल तर चेन्नईहून कोलंबोला जाण्यासाठी एअर इंडिया एक्‍स्प्रेसचे दररोज एक उड्डाण होईल.

दरम्यान, ईस्टर संडेनिमित्त भाविकांनी सकाळी विविध चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गर्दी केली असताना कोलंबोमधील सेंट अँटोनी चर्च, नेगोम्बो गावातील सेंट सेबॅस्टिअन चर्च आणि बॅटिकालोआ येथील एका चर्चमध्ये, तसेच कोलंबोमधील शांग्री-ला, सिनेमॉन ग्रॅंड आणि किंग्जबरी या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकाच वेळी बॉंबस्फोट घडवून आणण्यात आले. रविवारी (ता. 21) सकाळी 8.45 च्या सुमारास तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये हल्लेखोरांनी घडवून आणला. दुपारी आणखी दोन बॉंबस्फोटांमध्ये आणखी पाच जणांचे प्राण गेले. या स्फोटांमुळे "एलटीटीई'च्या पतनानंतर गेले श्रीलंकेत गेले दशकभर असलेली शांतता भंग पावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. मृतांमध्ये भारत, चीन, अमेरिका, ब्रिटनसह काही इतर देशांमधील 11 हून अधिक नागरिकांचाही समावेश आहे. जखमींमध्ये पाकिस्तान, अमेरिका, मोरोक्को आणि बांगलादेशच्या नागरिकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT