Israel Air Attack esakal
ग्लोबल

Israel Air Attack: इस्रायलचा गाझामधील हॉस्पिटलवर एअरस्ट्राईक, ५०० जण दगावल्याचा पॅलेस्टाईनचा दावा

सकाळ डिजिटल टीम

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आता चिघळले असून त्याने भीषण रूप धारण केले आहे. या युद्धात आजवर तब्बल 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक जखमी झाले आहेत. अशातच आज पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला की इस्रायलने गाझा पट्टीतील अल अहली हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला असून यात ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

मात्र, इस्रायलकडून अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. पण जर याची पुष्टी झाली तर 2008 नंतरचा हा इस्रायलचा सर्वात प्राणघातक हल्ला असेल. (Airstrike on hamas)

असोसीएटेड पोस्ट या वृत्तसंस्थेनुसार मंगळवारी मध्य गाझा येथील अल अहली हॉस्पिटलवर हा हवाई हल्ला झाला. गाझा पट्टीतील शेवटचे ख्रिश्चन रुग्णालय असे या हॉस्पिटलचे वर्णन केले जाते. गाझा आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की मंगळवारी इस्रायली सैन्याने अल अहली अरेबिक बॅप्टिस्ट हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला. या रुग्णालयात मोठ्या संख्येने जखमी आणि इतर पॅलेस्टिनी आश्रय घेत होते. 

अल अहली रुग्णालयावरील हल्ल्याच्या छायाचित्रांमध्ये इमारतीला आग लागल्याचे दिसत आहे. तुटलेल्या काचा इकडे तिकडे विखुरलेले आहेत. रुग्णालयात सर्वत्र मृतदेह विखुरलेले आहेत. 

पॅलेस्टाईनने या हल्ल्याची पुष्टी केली आणि सांगितले की, इस्रायली विमानांनी गाझामधील अल अहली अरब हॉस्पिटलवर बॉम्बफेक केली ज्यात 500 लोक शहीद झाले. यामध्ये महिला आणि लहान मुलेही आहेत. 

मात्र, इस्रायलकडून अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हेगेरी म्हणाले की, त्यांना रुग्णालयात मृत्यूची कोणतीही माहिती नाही. माहिती मिळताच हे अपडेट केले जाईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : फक्त जय आणि पार्थ हे माझं कुटुंब नाहीतर राष्ट्रवादी पक्ष हा माझा परिवार - सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT