Israeli officials announce in 24-hour Gaza ceasefire, signaling hopes for peace and regional stability in the Middle East.
esakal
Israel’s Major Decision: Ceasefire Declared in Gaza : इस्रायलने घोषणा केली आहे की कॅबिनेट बैठकीनंतर २४ तासांच्या आत गाझामध्ये युद्धबंदी लागू होईल. हा करार ट्रम्पच्या गाझा शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याचा भाग आहे, ज्यावर बुधवारी सकाळी इजिप्तमध्ये स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यपूर्वेतील शांतता प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याचे दिसत आहे.
इस्रायल-हमास करारानुसार, हमास सर्व ४८ ओलिसांना सोडेल, ज्यात २० जिवंत आणि उर्वरित मृतदेह असतील. त्या बदल्यात, इस्रायल देखील पॅलेस्टिनी नागरिक आणि पॅलेस्टिनींचे मृतदेह परत करणार आहे.
दरम्यान, इस्रायल सरकारच्या प्रवक्तांनी सांगितले आहे की, "आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर २४ तासांच्या आत गाझामध्ये युद्धबंदी लागू होईल. ओलिसांच्या सुटकेनंतर, गाझाच्या सुमारे ५३ टक्के भागावर सैन्याचे नियंत्रण असेल. पहिल्या टप्प्याच्या अंतिम मसुद्यावर इजिप्तमध्ये स्वाक्षरी करण्यात आली आहे."
दुसरीकडे इस्रायलसोबतच्या कराराचा भाग म्हणून हमास देखील पॅलेस्टिनी नेता मारवान बरघौतीची सुटका करण्याची मागणी करत होता, परंतु इस्रायलने स्पष्ट केले आहे की त्यांना सोडण्यात येणार नाही. बरघौती या सुटकेचा भाग राहणार नाही.
पॅलेस्टिनचा प्रमुख नेता बरघौती इस्रायलमध्ये बराच काळ तुरुंगात आहे आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पॅलेस्टिनी संघटनांनी त्याची सुटका करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत, परंतु इस्रायल कोणत्याही परिस्थितीत सुटका करण्यास तयार नाही.