ग्लोबल

Israel-Gaza Conflict: इस्रायल आणि गाझा यांच्यातला वाद नक्की काय आहे ? त्याचा इतिहास काय आहे ?

Chinmay Jagtap

Israel-Gaza Conflict: विश्वातील एकमेव जीव देश असलेल्या इस्रायलवर आज सकाळी गाझा पट्टीतुन रॉकेट 'हल्ला' करण्यात आला. यावेळी तब्बल ५ हजार रॉकेट इस्राईलवर डागण्यात आले. यावेळी रहिवाशी भागात आग लागल्याने संपूर्ण राहवासी भाग हा लाल दिसत आहे. पॅलेस्टाईनची अतिरेकी संघटना हमासने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

एकीकडे हमासने गाझा पट्टीतून इस्रायली शहरांवर मिसाईलचा वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे गाझा पट्टीतून त्याच्या दहशदवाद्यांनी इस्रायली शहरांमध्ये घुसून शहरावर हल्ला केला. यावेळी त्यांनी बेधुंद गोळीबार केला.

मात्र ही अतिरेकी संघटना नक्की इस्रायलवर हल्ले का करत आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. हमास आणि इस्राईल संघर्षाचा इतिहास किमान ७५ वर्षांपासूनचा आहे. हा संपूर्ण वाद वेस्ट बँक, गाझा पट्टी आणि गोलन हाइट्स यांसारख्या भागांवरून आहे. पूर्व जेरुसलेमसह या भागांवर पॅलेस्टाईनचा दावा आहे. मात्र इस्रायल जेरुसलेमवरील आपला दावा सोडायला तयार नाहीये

गाझा पट्टी सध्या हमासच्या ताब्यात आहे. २००५ साली इस्राईलने गाझा पट्टीवरुन आपले सैन्य मागे घेतले. मात्र पुढे २००७ला या भागावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले. अश्यावेळी वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्य स्थापन करावे, अशी पॅलेस्टाईनची मागणी आहे, जी इस्रायलला मान्य नाही. यामुळे हा संघर्ष उफाळला आहे. आता हमासने इस्राईलवर हल्ला केला आहे.आणि ही हमासची खप मोठी चूक असून याला आम्ही उत्तर देऊ असे इस्राईलने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT