benjamin netanyahu sakal
ग्लोबल

Israel Attacks Syria:लेबनाननंतर इस्राइलची सीरियाला 'धडक', हमासला मदत करणारं विमानतळ गोळीबार करुन केल उध्वस्त

इस्राइलचा सीरियावरील विमानतळावर हल्ला, हमासला शस्त्र पुरवणाऱ्या वापरली जाणारी धावपट्टी केली उध्वस्त

Manoj Bhalerao

Israel Attacked Syria:हमास या दहशतवादी संघटनेशी लढणाऱ्या इस्राइलने आता शेजारी राष्ट्र सीरियालाही तडाखा दिला आहे. इस्राइलने सीरियावरही हल्ला चढवला आहे, ज्यामुळे आता ही लढाई दोन गटांमधील राहिलेली नाही. सीरियन वृत्तपत्र 'अल-वतन'ने गुरुवारी (दि.१२ ऑक्टोबर) ही माहिती दिली.

वृत्तानुसार, इस्रायलने दमास्कस आणि अलेप्पोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हल्ला केलाय, त्यामुळे या दोन्ही विमानतळांवरील विमानांचे उड्डाण स्थगित करण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, विमानतळाच्या धावपट्टीवर कथितरित्या गोळीबार करण्यात आला आहे.

असा दावा केला जातोय की, हमासला इराणमधून शस्त्र पुरवण्यासाठी या विमानतळांचा वापर केला जात होता. या हल्ल्यातून इस्रायलने इराणमधून येणाऱ्या शस्त्रांना लक्ष्य केल्याचा संशय आहे. हा हल्ला झाल्यानंतर सीरियन आर्मीने देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

सीरियाच्या शासकीय टीव्ही वाहिनीने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, दुपारी दीडच्या सुमारास इस्रायली लष्कराने अलेप्पो आणि दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळांवर रॉकेट डागले. यामुळं हवाई पट्टीचे नुकसान झालं आहे. (Latest Marathi News)

शब्बात (ज्यू सुट्टीच्या दिवशी) शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी जेव्हा हमासच्या सैनिकांनी इस्रायलमध्ये प्रवेश केला आणि हल्ला केला, ज्यामुळे सर्वांचे डोळे विस्फारले. अत्याधुनिक लष्कर, तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या इस्राइलला या हल्ल्याला रोखताही आलं नाही. यानंतर इस्राइलने केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत हमासचे अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर प्रतिहल्ला चढवला आणि गाझापट्टीतील हमासचे अनेक अड्डे जमिनदोस्त केले. हमासच्या हल्ल्यानंतर सुरू झालेले युद्ध सुरूच आहे. युद्धात भाग घेण्यासाठी जगभरातून इस्रायली तेल अवीवला पोहोचत आहेत. दोन्ही देशांमधील युद्धात आतापर्यंत अंदाजे ३ ते ४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नागरिक आणि लष्करातील जवानांचा देखील समावेश आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

अमृता खानविलकरला करायचंय 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या बायोपिकमध्ये काम; म्हणाली- तिचं पात्र साकारणं हेच...

Vidhan Bhavan lobby clash Video: मोठी बातमी! विधानभवनाच्या लॉबीत राडा; पडळकर अन् आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले

'मेल्यानंतर तरी मला न्याय द्या' अभिनेत्याच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीने व्हिडिओ शेअर करत केले गंभीर आरोप, जीवन मृत्यूंशी देतेय झुंज

SCROLL FOR NEXT