Israel-Hamas War Esakal
ग्लोबल

Israel–Hamas war : इस्राईल-हमास युद्धात गाझातील 'एवढे' लोक मृत्यूमुखी; आरोग्य मंत्रालयाकडून अधिकृत आकडेवारी

गेल्या तीन महिन्यांपासून इस्राईल आणि हमास संघर्ष सुरू असून ७ ऑक्टोबरपासून आजतागायत गाझात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २० हजारांवर गेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जेरुसलेम : गेल्या तीन महिन्यांपासून इस्राईल आणि हमास संघर्ष सुरू असून ७ ऑक्टोबरपासून आजतागायत गाझात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २० हजारांवर गेली आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जारी केली असून त्यात २० हजार ५७ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. ही आकडेवारी गेल्या सात दशकांतील सर्वाधिक आहे.

हमासने ७ ऑक्टोबरला हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इस्राईलकडून जोरदार हल्ले सुरू झाले. हमासला एवढ्या प्रत्युत्तराची कल्पनाही नव्हती. इस्राईलच्या सैनिकांनी उत्तर ते दक्षिणपर्यंतच्या भागावर जोरदार बॉम्ब वर्षाव केले आणि त्यामुळे गगनचुंबी इमारती काही क्षणात जमीनदोस्त झाल्या.

त्यामुळे ठिकठिकाणी इमारतीचे अवशेष दिसून येत आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्राईलवर हल्ला केला आणि त्यात १२०० जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्राईल सैनिकांनी जमीनीवरून आणि हवेतून दोन्ही बाजूंनी गाझा पट्टीवर हल्ले सुरू केले.

१९४८ च्या अरब- इस्राईल युद्धात १५ हजार पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमुखी पडले होते. दुसरीकडे इस्राईल आणि अमेरिकी अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या या आकड्यांवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

कॅनडाकडून तात्पुरता व्हिसा

गाझात राहणाऱ्या नागरिकांचे नातेवाईक कॅनडात असतील तर त्यांना तात्पुरता व्हिसा देण्याची घोषणा शुक्रवारी कॅनडा सरकारने केली. देशाचे इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर यांनी म्हटले, येत्या नऊ जानेवारीपासून व्हिसा जारी करण्याची मोहीम सुरू होऊ शकते. मात्र युद्धग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबत कोणतेही आश्‍वासन दिलेले नाही.

सध्या गाझात ६६० हून अधिक कॅनडाचे रहिवासी असून त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. आई-वडिल, आजी-आजोबा, भाऊ-बहिण, नात-नातवंडे असे नातेसंबंधात असलेले नागरिक कॅनडात असतील तर तेथील नागरिकांकडून गाझातून बाहेर येण्यासाठी अर्ज करता येणार आहेत. हा व्हिसा तीन वर्षासाठी असेल. ही संख्या शेकडोंच्या घरात राहू शकते, असे मिलर म्हणाले. कॅनडातील नागरिकांना गाझातून बाहेर काढणे कठीण असून आम्हाला मर्यादा आहेत, असे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT