Israel Hamas War benjamin netanyahu big claim on gaza hospital attack hospital rocket blast marathi news  
ग्लोबल

Israel Hamas War : गाझा रुग्णालयावरील हल्ल्यात ५०० ठार! नेतान्याहू म्हणाले, इस्रायल नव्हे त्यांचंच रॉकेट...

इस्त्राइल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीयेत.

रोहित कणसे

इस्त्राइल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीयेत. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंनी ४५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान हमासने मंगळवारी उशीरा रात्री इस्त्राइली सेनेने एका रुग्णालयावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हमासचा हा दावा इस्त्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी फेटाळला आहे.

इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू म्हणाले की, संपूर्ण जगाला माहिती असायला हवं की गाझा येथे क्रूर हल्ला करण्यात आला, तो दहशतवाद्यांनी केला आहे इस्त्राइली सेनेने नाही. ज्या लोकांनी आमच्या मुलांच्या हत्या केल्या ते स्वतःच्या मुलांच्या देखील हत्या करतात.

यापूर्वी आयडीएफने माहिती देत सांगितले होते की, रुग्णालयावर झालेला ह्लाल इस्लामिक जिहाद जबाबदार आहे. आयडीएफने सांगितले की शत्रूंच्या बाजूने इस्त्राइलच्या दिशेने अनेक रॉकेट्स लाँच करण्यात आले होते. ज्यापैकी एक मिस फायर झालेलं रॉकेट या रुग्णालयावर कोसळलं. आमच्याकडून गुप्त माहितीनुसार, रुग्णालयावर झालेल्या या रॉकेट हल्ल्यात जिहाद दहशतवादी संघटना जबाबदार आहे.

हा रॉकेट हल्ला गाझा येथील अल अहली या रुग्णालयावर झाला आहे. हे गाझा पट्टीतील शेवटचे ख्रिश्चन रुग्णालय असल्याचे सांगितले जात आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला होता की मंगळवारी रात्री इस्त्राइली सनेने या रुग्णालयावर एअर स्ट्राइक केली. या रुग्णालयात अनेक जखमी आणि पॅलेस्टेनियन नागरिकांनी आसरा घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT