File photo
ग्लोबल

इस्राइल-हमास युद्धाला वळण; इस्राइली नागरिकांची सुटका करण्यासाठी हमास तयार, नेतन्याहू अटी मान्य करतील का?

Manoj Bhalerao

Hamas Israel War:हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या इस्राइलच्या नागरिकांच्या सुटकेबाबत इराणने मोठा दावा केला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, जर इस्राइलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले थांबवले तर हमास सुमारे 200 नागरिकांची सुटका करू शकेल.

मात्र, खुद्द दहशतवादी गटाने अशी कोणतीही ऑफर दिलेली नाही. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी तेहरानमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. इस्राइलविरुद्धच्या लढाईत इराण हा हमासचा मुख्य स्पॉन्सर मानला जात आहे.

हमासच्या नेत्यांनी सांगितले की त्यांच्या दहशतवाद्यांनी पकडलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी महत्वाची पाऊलं उचलण्याची गरज आहे. मात्र, ते हेही म्हणाले की असं कोणतही पाऊल उचलण्याआधी तयारीची गरज असते, जी अशा हल्ल्यांमध्ये शक्य नाही.

दहशतवाद्यांनी 199 जणांना ओलीस ठेवले: इस्राइली सैन्य

इस्राइली लष्कराने सांगितले की, हमास आणि इतर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी गाझामध्ये 199 लोकांना ओलीस ठेवले आहे, जे मागील अंदाजापेक्षा जास्त आहे. लष्कराचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी सोमवारी सांगितले की, ओलीसांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. ओलीस ठेवलेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे का, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. इस्राइली नागरिकांना कोणाच्या कैदेत ठेवण्यात आले होते हेही त्यांनी सांगितले नाही. गाझावर राज्य करणाऱ्या हमास या दहशतवादी संघटनेने यातील बहुतांश लोकांना ओलीस ठेवले असल्याचे मानले जात आहे.(Latest Marathi News)

संयुक्त राष्ट्राचं आवाहन

त्याचवेळी संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी हमासला कोणत्याही अटीशिवाय सर्व ओलीसांची तात्काळ सुटका करण्याचे आवाहन केले आहे. गुटेरेस म्हणाले की, इस्राइलला गाझामधील नागरिकांना जलद मदत पोहोचवण्याची परवानगी दिली पाहिजे. ते म्हणाले की गाझामध्ये पाणी, वीज आणि इतर आवश्यक पुरवठा संपत आहे.

इजिप्त, जॉर्डन, वेस्ट बँक आणि इस्राइलमध्ये संयुक्त राष्ट्रांकडे अन्न, पाणी, गैर-खाद्य वस्तू, वैद्यकीय पुरवठा आणि इंधनाचा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या गोष्टी काही तासांत गाझाला पोहोचवला जाऊ शकतो. गाझामधील पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये गेल्या 24 तासांत 455 पॅलेस्टिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून 856 जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT