Israel-Hamas war esakal
ग्लोबल

Israel-Hamas war : ''दहशतवादी रुग्णालयात लपलेले असल्याने तिथेही हल्ले करावे लागले'', इस्राईलकडून कबुली

जागतिक दबाव वाढला असताना अमेरिकेचा मात्र पाठिंबा मिळाल्याने बळ मिळालेल्या इस्राईलने रविवारी गाझा पट्टीतील खान युनिस शहरावर तुफान बाँबहल्ले केले.

सकाळ वृत्तसेवा

राफा (गाझा पट्टी) : जागतिक दबाव वाढला असताना अमेरिकेचा मात्र पाठिंबा मिळाल्याने बळ मिळालेल्या इस्राईलने रविवारी गाझा पट्टीतील खान युनिस शहरावर तुफान बाँबहल्ले केले. या हल्ल्यांमध्ये हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. मात्र, अनेक दहशतवादी मदत छावण्यांमध्ये आणि रुग्णालयात लपले असल्याने येथेही हल्ले करावे लागले, असे इस्राईलने सांगितले आहे.

इस्राईलने तातडीने युद्ध थांबवावे, यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये ठराव मांडण्यात आला होता. मात्र, अमेरिकेने व्हेटो अधिकार वापरून हा ठराव मंजूर होऊ दिला नाही.

एवढेच नाही तर, इस्राईलला १० कोटी डॉलर किमतीचे तोफगोळे विकण्यासही मंजुरी दिली. हमासला संपूर्णपणे नष्ट करण्याच्या इस्राईलच्या निश्‍चयाला अमेरिकेचा सक्रिय पाठिंबा मिळत असल्याने इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाला बळ मिळाले असून त्यांनी शनिवारी (ता. ९) रात्रीपासूनच खान युनिस शहरावर बाँबफेक सुरु केली. या शहरामध्ये जमिनीवरूनही कारवाई सुरु असून रणगाड्यांद्वारे मारा सुरू आहे.

गाझामध्ये अद्यापही हजारो जण

इस्राईलला उत्तर गाझामध्ये अजूनही हमासकडून विरोधाचा सामना करावा लागत आहे. सात ऑक्टोबरला हमासचा हल्ला झाल्यानंतर इस्राईलने उत्तर गाझामध्ये बाँबफेक सुरू करत नागरिकांना निघून जाण्याचा इशारा दिला होता.

युद्धाला आता दोन महिने उलटून गेल्यानंतर उत्तर गाझा जवळपास उद्ध्वस्त झाले असून गाझा पट्टीतील ८५ टक्के लोक विस्थापित झाले आहेत. तरीही गाझा शहर आणि परिसरात काही हजार नागरिक अजूनही राहात असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रत्येक घरात शिरून इस्राईलचे सैनिक शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT