Israel-Hamas War Esakal
ग्लोबल

Israel Hamas War : बोगदे आमच्या सैनिकांसाठी, जनतेला UN ने वाचवावं; हमास नेत्याचं वक्तव्य

गाझामध्ये हमास आणि इस्त्राइल यांच्यात युद्ध सुरु आहे. या

रोहित कणसे

गाझामध्ये हमास आणि इस्त्राइल यांच्यात युद्ध सुरु आहे. यादरम्यान हमासच्या एका नेत्याने गाझा पट्टीतील टनल्स त्यांच्या सैनिकांसाठी असल्याचे स्पष्ट केलं आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना वाचवण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांची असल्याचे देखील म्हटले आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की इस्त्राइलकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमध्ये आठ हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

रशिया टीव्ही टुडेला दिलेल्या माहितीत मूसा अबु मरजूक यांनी दाव केला आहे, नागरिकांना वाचवण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्र आणि इस्त्राइल यांची आहे. मीडल इस्ट मीडिया रिसर्ट इंस्टीट्यूट म्हणजेच Mermi टीव्हीकडून करण्यात आलेल्या अनुवादानुसार, मूसा यांनी सांगितलं की गाझामधील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी यूएन आणि इस्त्राइल यांची आहे.

मूसा यांनी सांगितलं की, आम्ही स्वतः टार्गेट बनू नयेत आणि मरण्यापासून वाचवण्यासाठी टनल्स तयार केले आहेत. हे हवाई हल्ल्यांपासून बचावासाठी आहेत. हमास नेत्याने सांगितल की त्यांच्याकडे टनल्सच्या माध्यमातून लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जिनेव्हा कन्व्हेशनचा हवाला देत त्यांनी सांगितलं की जेव्हापर्यंत ते ताब्यात आहेत, तेव्हापर्यंत त्यांना सर्व सेवा पुरवण्याची जबाबदारी यूएनची आहे.

इस्त्राइली सेनेने उत्तरी गाझामध्ये कारवाई केली. फिलिस्टीनी भागांमध्ये जमीनी कारवाई सुरू केल्याच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी दोन बाजूंनी हल्ला करण्यात आला, इस्त्राइली सेना आणि रणगाडे गाझाच्या उत्तरी शहरावर पूर्व आणि पश्चिम दिशेने हल्ला केला. दरम्यान या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांना रुग्णालयांच्या जवळ हवाई हल्ले केले जात असल्याबद्दल चेतावणी दिली. या रुग्णालयांमध्ये हजारो फिलीस्टीनी नागरिकांनी आश्रय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

कमी उंचीचा आंदोलक, पळून थकताच जवानाने उचलून कडेवर घेतल; पोलिसांकडे सोपवलं, VIDEO VIRAL

Navratri Day One: आज करा पहिल्या माळेच्या देवी शैलीपुत्रीची पूजा! जाणून घ्या पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

‘या’ मुजरा शैलीतील गाण्यासाठी रेखांनी 3 दिवस केली फक्त बोटांची प्रॅक्टिस; जुन्या गाण्याचा भन्नाट किस्सा माहितीये का?

मेट्रो-इंटरनेट सुरू करा, बॅरिकेड्स हटवा; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत...; सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांना आदेश

SCROLL FOR NEXT