US President Joe Biden will pay a solidarity visit to Israel 
ग्लोबल

Israel Hamas War : दोस्ती तुटायची नाय! जीव धोक्यात घालून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन इस्राइल दौऱ्यावर

रोहित कणसे

इस्त्राइल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू असून सगळ्या जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे. या युद्धात अमेरिका इस्त्राइलच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्त्राइलच्या बाजूने उघड भूमिका घेतली आहे. यागरम्यान इस्राइल दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडन देखील बुधवारी इस्राइलमध्ये दाखल होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच ते या भेटीदरम्यान इस्त्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची भेट देखील घेणार आहेत.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जो बायडेन यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ब्लिंकन यांच्या म्हणण्यानुसार, जो बायडेन नेतन्याहू यांची भेट घेतील आणि इस्राइलच्या पाठीशी उभे असल्याचा पुनरुच्चार देखील करतील. याशिवाय हमासविरुद्धच्या लढाईत सहकार्याबाबतही धोरणात्मक चर्चा देखील होणार आहे.

हमासने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर जो बायडन यांचा इस्त्राइल दौरा धोकादायक ठरू शकतो. हमासकडून सातत्याने हल्ले होत आहेत. हमास इस्रायलवर रॉकेट डागत आहे. या हल्ल्यांमुळे ब्लिंकन आणि नेतन्याहू यांनाही बंकरमध्ये लपून राहावे लागले. ब्लिंकन सौदी अरेबियालाही गेले होते. येथे ब्लिंकन यांनी सोधी अरेबियाने इस्त्राइली बंधकांना सोडून देण्यासाठी हमासची समजूत घालावी अशी विनंती केली. दरम्यान जीव धोक्यात घालून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्त्राइल दौऱ्यावर जात आहेत.

इस्त्राइल हमस युद्धादरम्यान सोमवारी अमेरिकेचा सूर काहीसा बदललेला दिसला. एकीकडे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हमासचा नायनाट आवश्यक असल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे त्यांनी टू स्टेट सॉल्युशन यावर देखील भाष्य केले. पॅलेस्टिनी राष्ट्राचा मार्गही मोकळा झाला पाहिजे, असे ते म्हणाले. जो बायडन म्हणाले की, इस्रायलने गाझा ताब्यात घेतला तर ती मोठी चूक ठरेल. मात्र, हमासला हाकलून देणे गरजेचे आहे.

जो बायडेन यांनी इस्रायलला इशारा दिला आहे की, गाझावर कब्जा करणे ही मोठी चूक ठरेल. १९६७ च्या युद्धानंतर इस्रायलने गाझा, वेस्ट बँक आणि जेरुसलेमवरही ताबा मिळवला. मात्र, नंतर गाझा आणि वेस्ट बँक मुक्त करण्यात आले. पश्चिम किनारा अजूनही अप्रत्यक्ष इस्रायलच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर गाझाला इस्रायलच्या परवानगीशिवाय कोणतीही आवश्यक वस्तू मिळू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT