ग्लोबल

Video : अपहरण केलेल्या चिमुकल्या ज्यू मुलाचा छळ; 'गाझा'मधील धक्कादायक व्हिडीओ

सकाळ डिजिटल टीम

Israel-Hamas : हमासने इस्राइलवर हल्ला केल्यानंतर इस्राइलने आणिबाणी घोषित केली आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी काही इस्राइली ज्यू मुलांचं अपहरण केलं असून त्यांना 'गाझा'मधील मोठी मुले त्रास देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

'Megh Updates' या ट्वीटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. त्यात दावा केलाय की, हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण करुन गाझामध्ये आणलेल्या मुलांचा छळ करण्यात येतोय. तेथील मोठी मुले लहान ज्यू मुलांना त्रास देत असल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे.

हमासने इस्राइलवर हल्ला केल्यानंतर दिवसेंदिवस परिस्थिती भीषण बनत चालली आहे. अशातच इस्राइलचं लष्कर आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या प्रतिहल्ल्यात साधारण ३१३ पॅलेस्टिनिन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती 'टाईम्स ऑफ इस्राइल'ने दिली आहे.

इस्राइलच्या लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितलं की, हमासच्या दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. त्यांच्या छुप्या ठिकाणांवर छापेमारी केली जात असून गाझामध्ये आता पर्यंत ४०० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. तर काहींना बंदी करण्यात आलेलं आहे.

दरम्यान, आणखी एक विदारक व्हिडीओ रविवारी सकाळी समोर आला होता. यात हमासच्या दहशतवाद्यांची क्रूरता दिसून आली. दहशतवाद्यांनी आई-वडिलांसमोर त्यांच्या मुलीचा जीव घेतला आहे. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

इस्त्राइलमधील पत्रकार हनाया नेफ्ताली यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यात मुलीचा तिच्या आई-वडिलांसमोरच जीव घेण्यात आला. तसेच तुमची मुलगी स्वर्गात जाईल, असं हमासचे दहशतवादी म्हणताना दिसत आहेत. मृत मुलीचे आई-वडील जिवाच्या आकांताने ओरडतात पण दहशतवादी दया दाखवत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT