Israel-Hamas War  esakal
ग्लोबल

Israel-Hamas War : ''अमेरिकेकडून शस्त्रास्त्र मिळाल्याने अनेक महिने युद्ध चालेल'', इस्राईलच्या पंतप्रधानांचा इशारा

अमेरिकेकडून शस्त्रास्त्रांची मदत मिळाल्याने गाझामधील हमासविरोधातील युद्ध ‘आणखी अनेक महिने’ चालेल, असा इशारा आज इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्लीः अमेरिकेकडून शस्त्रास्त्रांची मदत मिळाल्याने गाझामधील हमासविरोधातील युद्ध ‘आणखी अनेक महिने’ चालेल, असा इशारा आज इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला. त्यामुळे स्थलांतर कराव्या लागलेल्या पॅलेस्टिनी लोकांचे हाल आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा विरोध हे सर्व झुगारून नव्या वर्षातही गाझा पट्टीत युद्धाचे वातावरण कायम राहील, हे स्पष्ट झाले आहे.

अमेरिका सरकारने संसदेतील प्रक्रिया टाळून इस्राईलला शस्त्रास्त्रांची मदत जाहीर केली आहे. तसेच, अमेरिकेने संयुक्त राष्ट्रातही इस्राईलविरोधी ठराव हाणून पाडला होता. त्यामुळेच इतर अनेक देशांचा शस्त्रसंधीसाठी दबाव वाढत असतानाही गाझापट्टीत हल्ले सुरूच ठेवण्यावर इस्राईल ठाम आहे.

रविवारीही इस्राईलच्या लढाऊ विमानांनी खान युनिस शहराच्या नजीक असलेल्या नुसेरत आणि बुरैज या गावांमधील मदत छावण्यांवर हल्ले केले. सात ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्राईलने सुरू केलेल्या प्रतिहल्ल्यांमध्ये आतापर्यंत २१,६०० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये १६५ जण मृत्युमुखी पडले आहेत.

पत्रकारांशी बोलताना नेतान्याहू यांनी युद्ध दीर्घकाळ चालेल, असा इशारा दिला. ‘‘आमचे धोरण स्पष्ट आहे. हमासला नेस्तनाबूत करेपर्यंत आम्ही कारवाई सुरूच ठेवणार आहोत. हमासच्या ताब्यातील आमच्या लोकांची सुटका करणे, हेही आमचे उद्दिष्ट आहे. अमेरिकेने केलेल्या मदतीमुळे आम्हाला हे शक्य होणार आहे,’’ असे नेतान्याहू यांनी सांगितले. हमासच्या ताब्यात अद्यापही १२० जण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT