Naftali Bennett sakal
ग्लोबल

युक्रेन आणि रशिया युद्धात इस्राईल करणार मध्यस्थी

आम्ही ही अत्यंत अवघड, पण आवश्‍यक जबाबदारी शिरावर घेतली आहे; आंद्रे येरमॅक

सकाळ वृत्तसेवा

जेरुसलेम : युद्धग्रस्त युक्रेन आणि रशिया यांच्यात शांतता निर्माण करण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याचे इस्राईल सरकारने जाहीर केले आहे. आम्ही ही अत्यंत अवघड, पण आवश्‍यक जबाबदारी शिरावर घेतली आहे,’ असे इस्राईलच्या अध्यक्षीय प्रशासन विभागाचे प्रमुख आंद्रे येरमॅक यांनी ‘फेसबुक’च्या माध्यमातून सांगितले. युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि चीनदेखील प्रयत्नशील आहेत. मात्र दोन्ही देशांची भूमिका वेगवेगळी असल्याने त्यात किती प्रमाणात यश येईल, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

युक्रेनला मदत, पण रशियाला विरोध नाही

युक्रेन-रशिया वादात इस्राईलने आतापर्यंत कोणत्याही देशाची बाजू घेतलेली नाही. त्यांनी युक्रेनला मानवतावादी दृष्टीकोनातून मदत म्हणून शंभर टन साहित्याचा पुरवठा केला असला तरी लष्करी साहित्य अजिबात पुरविलेले नाही. रशियाच्या हल्ल्यांमुळे होणाऱ्या हानीबाबत इस्राईल सरकारने वारंवार चिंता व्यक्त केली असली तरी रशिया सरकारचा निषेध मात्र केलेला नाही. शस्त्र टाकून युद्ध संपविण्याचा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा निरोप इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी युक्रेन सरकारला दिला होता. मात्र, युक्रेनने त्याकडे दुर्लक्ष केले, असा दावा इस्राईल सरकारने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT