Israel Palestine Conflict e sakal
ग्लोबल

पॅलेस्टाईन-इस्त्रायल वाद चिघळला; रमजानच्या महिन्यात मशिदीत चकमक, ४२ जखमी

सकाळ डिजिटल टीम

जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीमध्ये पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या पोलिसांमध्ये आज शुक्रवारी चकमकी (Israel Palestine Conflict) झाली आहे. या संघर्षात ४२ जण जखमी झाले. याठिकाणी बराचवेळी तणाव होता. मुस्लिमांच्या पवित्र रमजानच्या महिन्यात ही हाणामारी झाली. पण, सध्या सर्व धोक्याबाहेर असून २२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असं रेड क्रॉसने सांगितले.

अल अक्सा मशिदीच्या पश्चिम भिंतीच्या बाजूने ज्यूंचे धार्मिक स्थळ आहे. दंगलखोरांनी पश्चिम दिशेच्या भिंतीच्या बाजूला दगडफेक केली. तसेच फटाके देखीलल फेकले. त्यानंतर पोलिसांना मशिदीमध्ये प्रवेश करावा लागला. यावेळी दंगलखोरांना शांत करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांचा वापर केला. तसेच तीन जणांना अटक केली आहे, असं इस्त्रायलच्या पोलिसांनी सांगितलं. सध्या याठिकाणी शांतता असून मुस्लीम बांधव मशिदीत सुरक्षितपणे प्रवेश करत आहेत. पण, जेरुसलेमच्या जुन्या वस्तीत तणाव कायम आहे. हा पूर्व जेरुसलेमच्या भाग असून इस्त्रायलने ताब्यात घेतला आहे.

अल अक्सा हे मुस्लिमांसाठीचे धार्मिक स्थळ असून टेम्पल माउंट हे ज्यूंसाठी पवित्र आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अल अक्सा मशिदीमध्ये संघर्ष सुरू आहे. यामध्ये जवळपास ३०० पॅलेस्टाईन नागरिक जखमी झाले आहेत. रमजानच्या काळात इस्त्रायलने मशिदीवर हल्ला केल्याने जगाची चिंता वाढली आहे. इस्लामिक गट हमास जेरुसलेममध्ये अस्थिरता पसरवत असल्याचे इस्त्रायलचं म्हणणं आहे. इस्रायल व्याप्त जेरुसलेममधील हिंसाचारानंतर हमास गट आणि इस्त्रायल यांच्यातील वाद आणखी चिघळला आहे. त्यामुळे एका नव्या युद्धाची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही आठवड्यांपूर्वी गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने रॉकेट डागण्यात आले होते, ज्याला इस्रायलने प्रत्युत्तर दिले. परंतु कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT