ग्लोबल

Israel Palestine Conflict : इस्रायली सैन्याची पहिली मोठी शिकार! हमासच्या नौदल कमांडरला उचललं

इस्त्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे

रोहित कणसे

Israel Palestine Conflict : इस्त्राइल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यात संघर्ष पेटला आहे. हजारो क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आल्यानंतर इस्त्राइलकडून देखील प्रत्युत्तर दिलं जात आहे. यादरम्यान इस्त्राइली लष्कराला मोठं यश मिळालं आहे. इस्त्राइलच्या सैन्याने हमासच्या नौदल कमांडर मोहम्मद अबु अली आला ताब्यात घेतले आहे.

इस्त्राइलचं हमासला जोरदार प्रत्युत्तर

मोहम्मद अबु अली अबु अली याच्या ब्रिगेडनेच इस्त्राइली म्यूझिक फेस्टिव्हलवरती हल्ला केला होता. यानंतर इस्त्राइलच्या हवाईदलाने त्याच्या इमारतीवर बॉम्ब टाकले होते. येथेचे राहून हमासचे बडे कमांडर युद्धाचे नेतृत्व करत होते.

या युद्धाच दहशतवादी संघटनेच्या अनेक ऑपरेशनल मुख्यालयांवर देखील बॉम्ब टाकण्यात आले आहेत. हमासचा कमांडर मोहम्मद कास्ता याच्या ठिकाणांवर देखील एअरफोर्सने बॉम्ब टाकले होते. या हल्ल्यात तो ठार झाला. तो हमासच्या नौदलाशी संबंधीत होता. यानंतर इस्त्राइली सैन्याने हमासच्या नौदलाचा कमांडर मुहम्मद अबु अली याला देखील ताब्यात घेतले आहे.

इस्रायली हवाई दलाने माहिती दिली आहे की याशिवाय जबालिया भागात हमासची एक ऑपरेशनल इमारत देखील उडवण्यात आली आहे जी मशिदीच्या मध्ये होती. हमासच्या गुप्तचर विभागाकडून वापरण्यात आलेली एक इमारत देखील इस्रायली हवाई दलाने जमीनदोस्त केली.

हजारहून अधिक मृत्यू

युद्धाच्या दुसऱ्या दिवशी इस्त्राइली सेना आणि हमास यांच्यामध्ये जागोजागी चकमकी झाल्या. इस्त्राइलवर करण्यात आलेल्या भीषण हल्ल्यात इस्त्राइली सैन्यासह ७०० लोकांचा मृत्यू झाला आहे तर १,९०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तरादाखल गाझा पट्टीत इस्त्राइलने केलेल्या हल्ल्यात ४५० हून अधिक लोक ठार झाले आहेत तर तब्बल २,३०० जखमी झाले आहेत. यामुळे एकूण मृतांचा आकडा १००० हून अधिक झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT