Israel-Hamas War eSakal
ग्लोबल

Israel Army in Gaza City : "हमासला संपवूनच मागे फिरणार"; गाझा शहरापर्यंत पोहोचलं इस्राइलचं सैन्य

Israel Hamas War : इस्राइल-हमास युद्ध सुरू होऊन आता एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे.

Sudesh

7 ऑक्टोबर रोजी हमास या दहशतवादी संघटनेने इस्राइलवर मोठा हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर देत इस्राइलने काही तासांमध्येच युद्धाची घोषणा केली होती. सुरुवातीला गाझा पट्ट्यामध्ये हवाई हल्ले केल्यानंतर इस्राइलने आपले सैनिक देखील याठिकाणी पाठवण्यास सुरुवात केली होती. आता आपलं सैन्य मुख्य गाझा शहरात पोहोचलं असल्याचं इस्राइलने सांगितलं आहे.

इस्राइलचे संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांनी याबात माहिती दिली. "आम्ही गाझा शहराच्या मध्यात आहोत. गाझा हा जगातील सर्वात मोठा दहशतवादी तळ आहे. आम्ही हमासला पूर्णपणे नष्ट करुनच परतणार आहोत", असं ते म्हणाले.

लेबननला दिला इशारा

यावेळी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबननला देखील इशारा दिला. "हिजबुल्लाह संघटनेने या युद्धामध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करू नये. ती त्यांच्या आयुष्यातील शेवटची चूक असेल", अशा शब्दांमध्ये नेतन्याहू यांनी हिजबुल्लाह संघटनेला इशारा दिला आहे. हिजबुल्लाह ही हमास प्रमाणेच एक संघटना आहे. या संघटनेला इराणचा पाठिंबा मिळालेला आहे. (Global News)

नेतन्याहू पुढे म्हणाले, की जोपर्यंत इस्राइलच्या 240 ओलीस ठेवलेल्या नागरिकांना सोडलं जात नाही, तोपर्यंत शस्त्रसंधीचा विचारही केला जाणार नाही. तसंच, गाझा पट्ट्यात इंधन देखील जाऊ दिलं जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT